Home Breaking News ​FDI आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, तुम्हाला महाराष्ट्राचा सॅल्यूट! ​‘आधीचे अधिकारी धृतराष्ट्रासारखे डोळ्यांवर...

​FDI आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, तुम्हाला महाराष्ट्राचा सॅल्यूट! ​‘आधीचे अधिकारी धृतराष्ट्रासारखे डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प का होते?’: आरोग्य रक्षक स्वप्निल देशमुख यांचा व्यवस्थेला जळजळीत सवाल ​✍🏻 स्वप्निल देशमुख संग्रामपूर :- ​आजच्या काळात सर्वसामान्य माणूस जेव्हा बाजारात जातो, तेव्हा तो फक्त अन्न किंवा औषध विकत घेत नाही, तर तो आपल्या मुलाबाळांचे, कुटुंबाचे आयुष्य आणि स्वतःचा विश्वास बाजारात ठेवत असतो. पण दुर्दैवाने, त्याच बाजारात आज आरोग्याचा उघड व्यापार सुरू आहे. औषधांमधील भेसळ, अन्नातील विषारी घटक आणि नफेखोरांचा अमानुषपणा यांमुळे सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अनेकदा आपली व्यवस्था झोपलेली असते, अधिकारी फाईलींच्या ढिगाऱ्यात सुस्त असतात आणि जनतेच्या आरोग्याचा सौदा करणारे निर्धास्तपणे आपले साम्राज्य चालवत असतात. ​पण, जेव्हा पापचा घडा भरतो, तेव्हा व्यवस्थेला हादरा देण्यासाठी एखादा महानायक जन्माला येतो. आज अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रासाठी तेच नाव बनले आहे. ज्यांच्या नावानेच भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणतात, त्या तुकाराम मुंडे साहेबांच्या धडाकेबाज कामगिरीला माझा आणि या महाराष्ट्रातील करोडो जनतेचा मनापासून सॅल्यूट! ​धृतराष्ट्राची भूमिका घेणारे अधिकारी कुठे गेले? तुकाराम मुंडे साहेबांची कामगिरी पाहताना मनात एक तीव्र आणि तितकाच वेदनादायी प्रश्न निर्माण होतो- “या अगोदरचे अधिकारी महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प का होते?” अनेक वर्षे ज्यांच्यावर कुणाचाच धाक नव्हता, जे जनतेच्या रक्ताने आपले खिसे भरत होते, ते यापूर्वीच्या प्रशासनाला का दिसले नाहीत? की पाहूनही न पाहिल्यासारखे डोळे मिटून घेतले गेले होते? जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा सुरू असताना आधीचे अधिकारी गप्प का राहिले, हा सवाल आज प्रत्येक सजग नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे. ​मुंडे साहेब, तुम्ही फक्त छापे टाकत नाही, तर विश्वास देताय! साहेब, तुम्ही फक्त छापे टाकत नाही आहात, तर तुम्ही जनतेच्या मनात कायद्याबद्दलचा आदर आणि नफेखोरांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करत आहात. तुमच्या धाडसी कारवायांमुळे आज गरिबाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. या व्यवस्थेत अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे, अजूनही सामान्यांचे ऐकणारा कुणीतरी पाठीशी उभा आहे, हा विश्वास तुम्ही दिला आहे. ​प्रामाणिक अधिकारी असणे सोपे नसते. कारण प्रामाणिकपणाची किंमत संघर्षाने चुकवावी लागते. सतत बदल्या, टीका, दबाव आणि विरोध यांच्या काट्यांवरून चालावे लागते. पण तरीही जो अधिकारी जनतेच्या हितासाठी डोंगरासारखा ठाम उभा राहतो, तोच खऱ्या अर्थाने ‘जनतेचा अधिकारी’ ठरतो. तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही त्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक आहात ज्यांनी पदाला नाही, तर कर्तव्याला देव मानले. ​महाराष्ट्राच्या जनतेचा एकच आवाज! आज लाखो नागरिकांच्या मनातील भावना एकाच वाक्यात व्यक्त करायची झाली तर ती एवढीच— “साहेब, आम्हाला तुमच्यासारखे अधिकारी हवे आहेत. कारण तुम्ही खुर्चीसाठी नाही, तर जनतेच्या जगण्यासाठी काम करता.” ​जोपर्यंत तुमच्यासारखा प्रामाणिक आणि करारी बाण्याचा सूर्य प्रशासनात तळपत आहे, तोपर्यंत भ्रष्टाचाराचा अंधार नक्कीच दूर होईल. जनतेच्या आरोग्यासाठी, न्यायासाठी आणि या सडलेल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तुम्ही पुकारलेल्या महायुद्धाला एक पत्रकार आणि आरोग्य रक्षक म्हणून माझा जाहीर पाठिंबा आहे. ​साहेब, तुमच्या या लढ्याला आणि तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्राचा मानाचा मुजरा… तुम्हाला माझा सॅल्यूट! 🫡 चौकट मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, FDI आयुक्त पदावर तुकाराम मुंडे टिकणे गरजेचे! “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या संवेदनशील मनावर आणि कणखर नेतृत्वावर या महाराष्ट्राचा नेहमीच गाढ विश्वास राहिला आहे. आज जेव्हा एखादा गरीब बाप आपल्या आजारी मुलासाठी औषध आणतो, तेव्हा त्या औषधात भेसळ तर नाही ना? या भीतीने त्याचे हात थरथरतात. अन्नातून विष आणि औषधांतून मृत्यू विकणाऱ्या नफेखोरांनी आज संपूर्ण व्यवस्था पोखरून काढली आहे. अशा मरणाच्या दारात उभ्या असलेल्या जनतेला वाचवण्यासाठी आज FDI आयुक्त पदावर तुकाराम मुंडे साहेबांसारखा एक वज्राहून कठीण आणि प्रामाणिक अधिकारी यंत्रणेला मिळाला आहे. साहेब, ही केवळ एका अधिकाऱ्याची बदली किंवा नियुक्ती नाही, तर हा लाखो गोरगरिबांच्या जगण्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. ही मोहीम थांबली, तर माफिया पुन्हा डोके वर काढतील. म्हणूनच, महाराष्ट्राच्या हितासाठी मुंडे साहेब FDI आयुक्त पदावर दीर्घकाळ टिकणे अत्यंत गरजेचे आहे. गरिबांच्या आरोग्याचा हा टाहो आपण नक्कीच ऐकाल, हाच आम्हा सर्वांना ठाम विश्वास आहे!” ​ – स्वप्निल बापू देशमुख (पत्रकार तथा आरोग्य रक्षक) मोबाईल

5

​​FDI आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, तुम्हाला महाराष्ट्राचा सॅल्यूट!
​‘आधीचे अधिकारी धृतराष्ट्रासारखे डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प का होते?’: आरोग्य रक्षक स्वप्निल देशमुख यांचा व्यवस्थेला जळजळीत सवाल
​✍🏻 स्वप्निल देशमुख

संग्रामपूर :- ​आजच्या काळात सर्वसामान्य माणूस जेव्हा बाजारात जातो, तेव्हा तो फक्त अन्न किंवा औषध विकत घेत नाही, तर तो आपल्या मुलाबाळांचे, कुटुंबाचे आयुष्य आणि स्वतःचा विश्वास बाजारात ठेवत असतो. पण दुर्दैवाने, त्याच बाजारात आज आरोग्याचा उघड व्यापार सुरू आहे. औषधांमधील भेसळ, अन्नातील विषारी घटक आणि नफेखोरांचा अमानुषपणा यांमुळे सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अनेकदा आपली व्यवस्था झोपलेली असते, अधिकारी फाईलींच्या ढिगाऱ्यात सुस्त असतात आणि जनतेच्या आरोग्याचा सौदा करणारे निर्धास्तपणे आपले साम्राज्य चालवत असतात.
​पण, जेव्हा पापचा घडा भरतो, तेव्हा व्यवस्थेला हादरा देण्यासाठी एखादा महानायक जन्माला येतो. आज अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रासाठी तेच नाव बनले आहे. ज्यांच्या नावानेच भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणतात, त्या तुकाराम मुंडे साहेबांच्या धडाकेबाज कामगिरीला माझा आणि या महाराष्ट्रातील करोडो जनतेचा मनापासून सॅल्यूट!
​धृतराष्ट्राची भूमिका घेणारे अधिकारी कुठे गेले?
तुकाराम मुंडे साहेबांची कामगिरी पाहताना मनात एक तीव्र आणि तितकाच वेदनादायी प्रश्न निर्माण होतो- “या अगोदरचे अधिकारी महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प का होते?” अनेक वर्षे ज्यांच्यावर कुणाचाच धाक नव्हता, जे जनतेच्या रक्ताने आपले खिसे भरत होते, ते यापूर्वीच्या प्रशासनाला का दिसले नाहीत? की पाहूनही न पाहिल्यासारखे डोळे मिटून घेतले गेले होते? जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा सुरू असताना आधीचे अधिकारी गप्प का राहिले, हा सवाल आज प्रत्येक सजग नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे.
​मुंडे साहेब, तुम्ही फक्त छापे टाकत नाही, तर विश्वास देताय!
साहेब, तुम्ही फक्त छापे टाकत नाही आहात, तर तुम्ही जनतेच्या मनात कायद्याबद्दलचा आदर आणि नफेखोरांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करत आहात. तुमच्या धाडसी कारवायांमुळे आज गरिबाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. या व्यवस्थेत अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे, अजूनही सामान्यांचे ऐकणारा कुणीतरी पाठीशी उभा आहे, हा विश्वास तुम्ही दिला आहे.
​प्रामाणिक अधिकारी असणे सोपे नसते. कारण प्रामाणिकपणाची किंमत संघर्षाने चुकवावी लागते. सतत बदल्या, टीका, दबाव आणि विरोध यांच्या काट्यांवरून चालावे लागते. पण तरीही जो अधिकारी जनतेच्या हितासाठी डोंगरासारखा ठाम उभा राहतो, तोच खऱ्या अर्थाने ‘जनतेचा अधिकारी’ ठरतो. तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही त्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक आहात ज्यांनी पदाला नाही, तर कर्तव्याला देव मानले.
​महाराष्ट्राच्या जनतेचा एकच आवाज!
आज लाखो नागरिकांच्या मनातील भावना एकाच वाक्यात व्यक्त करायची झाली तर ती एवढीच— “साहेब, आम्हाला तुमच्यासारखे अधिकारी हवे आहेत. कारण तुम्ही खुर्चीसाठी नाही, तर जनतेच्या जगण्यासाठी काम करता.”
​जोपर्यंत तुमच्यासारखा प्रामाणिक आणि करारी बाण्याचा सूर्य प्रशासनात तळपत आहे, तोपर्यंत भ्रष्टाचाराचा अंधार नक्कीच दूर होईल. जनतेच्या आरोग्यासाठी, न्यायासाठी आणि या सडलेल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तुम्ही पुकारलेल्या महायुद्धाला एक पत्रकार आणि आरोग्य रक्षक म्हणून माझा जाहीर पाठिंबा आहे.
​साहेब, तुमच्या या लढ्याला आणि तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्राचा मानाचा मुजरा… तुम्हाला माझा सॅल्यूट! 🫡

चौकट

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
FDI आयुक्त पदावर तुकाराम मुंडे टिकणे गरजेचे!
“माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
तुमच्या संवेदनशील मनावर आणि कणखर नेतृत्वावर
या महाराष्ट्राचा नेहमीच गाढ विश्वास राहिला आहे.
आज जेव्हा एखादा गरीब बाप आपल्या आजारी मुलासाठी
औषध आणतो, तेव्हा त्या औषधात भेसळ तर नाही ना?
या भीतीने त्याचे हात थरथरतात. अन्नातून विष
आणि औषधांतून मृत्यू विकणाऱ्या नफेखोरांनी आज संपूर्ण व्यवस्था पोखरून काढली आहे. अशा मरणाच्या
दारात उभ्या असलेल्या जनतेला वाचवण्यासाठी आज
FDI आयुक्त पदावर तुकाराम मुंडे साहेबांसारखा एक वज्राहून कठीण आणि प्रामाणिक अधिकारी
यंत्रणेला मिळाला आहे.
साहेब, ही केवळ एका अधिकाऱ्याची बदली किंवा
नियुक्ती नाही, तर हा लाखो गोरगरिबांच्या
जगण्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. ही मोहीम
थांबली, तर माफिया पुन्हा डोके वर काढतील.
म्हणूनच, महाराष्ट्राच्या हितासाठी मुंडे साहेब
FDI आयुक्त पदावर दीर्घकाळ टिकणे अत्यंत
गरजेचे आहे. गरिबांच्या आरोग्याचा हा टाहो आपण
नक्कीच ऐकाल, हाच आम्हा सर्वांना ठाम विश्वास आहे!”

– स्वप्निल बापू देशमुख
(पत्रकार तथा आरोग्य रक्षक)
मोबाईल