आशाताई बच्छाव
उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे जागतिक परिचारिका दिन साजरा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
दि. 12 मे 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेश देवनीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून लोकसेवा मंडळाचे सदस्य श्री शिवानंद शिवाचार्य, डॉ. पूजा गायकवाड, श्री मारुती पुलचुवाड ,डॉ. अनिल थडके हे होते. प्रथम जागतिक परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .याप्रसंगी सर्व परिचारिकांनी परिचारिका दिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवनेकर व लोकसेवा मंडळ यांच्या वतीने सर्व परिचारिकाना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या परिचारिका दिनाचे प्रस्ताविक या रुग्णालयाच्या इनचार्ज सिस्टर श्रीमती मनीषा बोईनवाड यांनी केली. लेडी ऑफ द लॅम्प फ्लॉरेन्स नाईटिंगले यांच्या जीवन प्रवास त्या काळातील युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशी होती ,युद्धातील जखमीना त्यांच्या जखमावर मलमपट्टी करून सेवा केली आणि मृत्यूदर कमी करण्यात मदत केली.यावर सविस्तर प्रकाश टाकला.
एन.सी.डी. कॉन्सलर श्रीमती ॲड .छाया पाटील यांनी आपले मनोगत मांडताना परिचारिकेने कोरोना काळात अवघड परिस्थितीत कशी सेवा दिली व त्यांचा प्रवास कसा झाला. याविषयी सविस्तर असे आपले मनोगत व्यक्त करून सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री मारुतीराव पुलचुवाड यांनी आपल्या भाषणात सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या, कोरोना या काळात केलेल्या कार्याचा उल्लेख करून, सेवा ,करुणा याविषयी आपली सेवा उत्तम असते ,यामुळेच अनेक रुग्णांना सेवा मिळून त्यांना जीवनदान मिळते असे उद्गार काढले व त्यांच्या कार्याचा गौरव केला व शुभेच्छा दिल्या.
लोकसेवा मंडळाचे श्री शिवानंद शिवाचार्य यांनी या रुग्णसेवेस ईश्वरांची सेवा असे समजले आपण आपली प्रकृती सांभाळून किती सुंदर सेवा या रुग्णदेवतांना आपल्या हातून घडत आहे, अशी सेवा आपल्या हातून घडत राहो .आपल्या कार्याला नमन करून त्यांनी सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या डॉ. पूजा गायकवाड यांनी आपल्या मनोगतात परिचारिकेला तिहेरी भूमिका कशी उचलतात चुल, मुल , आरोग्य सेवा , रात्रपाळी सेवा ,जोखीमीच्या सेवा ,अति गंभीर रुग्णांवर करावयाचे उपचार धीराने करणाऱ्या परिचारिका या आधुनिक काळातील देवी स्वरूप आहेत. त्या मनोभावे रुग्णाची सेवा करतात त्यांचं कौतुक करून त्यांना या शुभ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या जागतिक परिचारिका दिनाच्या समारोप करताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवनिकर यांनी आद्यपरिचारिका या आधुनिक नर्सिंग चे प्रणेते मानले जाते ,आरोग्य सेवा, समाजसेवा ,अर्थव्यवस्थेमध्ये, परिचारिकेचा महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण भूमिका व त्यांचा सन्मान म्हणजेच जागतिक परिचारिका दिन होय. आधुनिक सुश्रुषा शास्त्राची संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगले या होत. यांच्या जयंतीनिमित्त सर्व परिचारिकाना या दिनाच्या शुभेच्छा देऊन परिचारिकेमुळेच रुग्णालयाचे नाव उज्वल होण्यास मदत मिळते. असे गौरगाव काढले.नर्स ह्या काळजीवाहक ,संवादक, शिक्षक, प्रशिक्षक ,समुपदेशक, नेता , संशोधक, समर्थक ,सहयोगी असतात. व्यक्ती केंद्रित सुरक्षित आणि प्रभावी सेवा देणे हे त्यांच्या जबाबदाऱ्या असतात असे सांगितले.
या कार्यक्रमानंतर रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. अनिल थडके ,डॉ. सचिन गायकवाड ,डॉ. भगवान पितळे, डॉ. रवि काळे, डॉ. मोहम्मद उस्मान ,डॉ. शेख मुजीब, डॉ. व्ही.के.काझी ,डॉ. संजय लाडके तसेच लोकसेवा मंडळाचे श्री रामचंद्र दंतुलवार ,श्री गंगाकुमार कळसकर, श्री अशोक गुजरवाड, श्री अशोक कुलकर्णी ,श्री परशुराम केरले, श्री अशोक शिंगेवाड सर्व डॉक्टर्स ,सर्व परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री माधव मगर ,श्री राहुल रोकडे ,श्री विजय चडके ,श्री मुंडे ,श्री मठवाले व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






