Home नाशिक जगद्विख्यात समाजसुधारक आणि प्रगतिशील राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जयंती दिनी...

जगद्विख्यात समाजसुधारक आणि प्रगतिशील राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जयंती दिनी कौळाणे (नि.) येथे दुर्दैवी शोकांतिका घडल्याचे चित्र समोर आले आहे.

70

कौळाणे (नि.) :

जगद्विख्यात समाजसुधारक आणि प्रगतिशील राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जयंती दिनी कौळाणे (नि.) येथे दुर्दैवी शोकांतिका घडल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातील ऐतिहासिक वारसा असलेल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त करत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आंदोलन सुरू असून त्यांना लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत पवार, चांदवड तालुकाध्यक्ष सुनील गांगुर्डे, बागलाण तालुकाध्यक्ष दावल पगारे तसेच आंशूराज राऊत पाटील यांनी पाठिंबा देत उपोषणात सहभाग घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौळाणे येथील श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या मुख्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरच एका व्यक्तीने वेल्डिंगचा व्यवसाय सुरू करून अतिक्रमण केले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या या स्थळावर झालेले अतिक्रमण तात्काळ व कायमस्वरूपी हटविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, या गंभीर विषयाकडे ग्रामपंचायतीने वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केले. परिणामी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आमरण उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.

दरम्यान, जयंतीच्या दिवशीच गावातील ऐतिहासिक वास्तूच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण कायम असल्याने ग्रामस्थांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अतिक्रमण हटवावे आणि राजवाड्याच्या परिसराचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous articleEpaper yuva maratha 8 march
Next articleकौळाणे (नि.) : राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण प्रकरण तापले; आंदोलनानंतर ग्रामपंचायतीची हालचाल, संबंधित व्यक्तीस नोटीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.