आशाताई बच्छाव
मालेगाव | प्रतिनिधी विजय चांदणे:-
आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या सामाजिक संस्थेची अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) येत्या शिवजयंती दिनी मोठ्या उत्साहात लाँच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या कार्याला डिजिटल माध्यमातून नवी दिशा देण्याचा हा उपक्रम असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांची माहिती आता नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. तसेच संस्थेचे उद्दिष्ट, प्रकल्प, सदस्य नोंदणी, उपक्रमांचे फोटो व व्हिडिओ आदी माहिती संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
संस्थेचे पदाधिकारी म्हणाले की, “डिजिटल युगात सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संकेतस्थळ महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. शिवजयंतीच्या प्रेरणादायी दिवशी या नव्या प्रवासाची सुरुवात करीत आहोत.”
शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार असून, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.






