आश्रयआशा फाऊंडेशन
व-हाणे,ता.मालेगाव (नाशिक)
……………………………….
प्रिय स्नेही जनहो,
सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय! आज आपल्याशी थोडंसं मनमोकळ हितगूज करण्यासाठी हा शब्दपसारा मांडत आहोत.आम्ही १४ आँगस्ट २०२१ या वर्षी समविचारी व्यक्तीनी एकत्र येऊन आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच संस्थेचे रजिस्ट्रेशन नाशिकच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून करून घेतले.त्यानंतर संस्थेने मागे वळून पाहिले नाही.तर प्रत्येक पाऊल मोठ्या आत्मविश्वासाने पुढे पुढे टाकत ,संस्थेने विविध क्षेत्रात कामगिरी करतानांच संस्थेचे अधिकृत व नोंदणीकृत कार्यालय व-हाणे, ता.मालेगाव जि.नाशिक येथे ठेवले.संस्थेने आजपर्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण,शाळांना महापुरुषांच्या फोटोफ्रेम भेट देण्या सोबतच जागतिक महिला दिनानिमित्त “नारीगौरव पुरस्कार सन्मान” सन्मान सोहळ्याचे आयोजन करून कर्तबगारी सिध्द केली.तर संस्थेला अल्पावधीतच भारत सरकारचे निती आयोगाचे रजिस्ट्रेशन प्राप्त झाले .आणि संस्थेला आय.एस.ओ.मानाकंन मिळविणारी आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे ही संस्था अग्रेसर म्हणून नावारूपास आली .संस्थेने आपल्या २६ कलमी कार्यक्रमांतर्गत “युवा मराठा महासंघ महाराष्ट्र ” या सामाजिक संघटनेची स्थापना करून विविध प्रश्नांना वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे .त्याशिवाय संस्थेच्या ध्येय धोरणानुसार “लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना महाराष्ट्र “स्थापना ९ आँगस्ट २०२५ रोजी क्रांतीदिनी केली .आता लवकरच संस्थेला आयकर विभागाचे “८० जी सर्टिफिकेट व १२ अ ” हे दोन्ही सर्टीफिकेट प्राप्त होत आहेत .शिवाय आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेची स्वत:ची स्वतंत्र वेबसाईट या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होत असल्याने संस्थेचे कार्य आता संपूर्ण जगभरात दिसणार व समजणार आहे .संस्थेने यापुर्वीच आपले स्वतःचे “आश्रयआशा फाऊंडेशन ” हे युटूयुब चँनल सुरू केलेले असून ,संस्थेने कुटूंब अँपव्दारे आपले कार्य सर्वदूर पसरविलेले आहे .यापुढे फक्त आपल्या मायबाप जनतेचे आशिर्वाद पाठीशी असू द्यावेत हिच माफक अपेक्षा!
राजेंद्र पाटील राऊत संस्थापक अध्यक्ष
राजेंद्र तुकाराम पवार उपाध्यक्ष
श्रीमती आशाताई (अलका ) शांतीलाल बच्छाव सचिव





