आशाताई बच्छाव
पर्यावरण रक्षक फाउंडेशन यांसकडून धुळे जिल्ह्यांमध्ये १५००० बांबू रोपांची लागवड. दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे धुळे जिल्ह्यातील देऊर गावामध्ये बांबू लागवड अभियान अंतर्गत बांबू लागवड करण्यात आली आज जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावत आहे आणि आज संपूर्ण पृथ्वी धोक्यामध्ये आहे प्रदूषण आज प्रचंड पटीने वाढत चालले आहे आणि त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे आज दिल्ली मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये हवा शुध्द घेण्यासाठी एयर प्युरीफाय बसवीणयाण्याची वेळ वरील सर्व शहरवासीयांच्या घरी आलेली आहे , आज झाडे तोडायचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे पण झाडे लावण्याचा विचार कोणीही करत नाही आणि अशीच परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या काळात मानवसृष्टी होरपळून दुर्दैवी अंत्य होऊ शकते असे पर्यावरणावर काम करणाऱ्या तज्ञांचे म्हणणे आहे , म्हणून आज निसर्ग वाचवायचा असेल तर झाडेच लावावी लागेल आणि तर आणि तरच ही निसर्ग सृष्टी वाचू शकेल आज जर ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचे असेल तर जगाने बांबू या वनस्पतीला मान्यता दिली आहे कारण जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी आणि सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती ती म्हणजे बांबू,माणसाला जगायला वर्षभरात २८०kg ऑक्सिजन लागतो आणि बांबूचे एक झाड वर्षाला ३२०kg ऑक्सिजन देते म्हणजे बांबू मनुष्य सृष्टीला किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजते एका बांबूपासून २००० प्रोडक्ट तयार केले जातात त्यामध्ये बांबूपासून लोणचे कपडे सीएनजी इथेनॉल एयरपोर्ट फर्निचर घरे भाजी मीठ बिअर घरातील सर्व वस्तू प्लास्टिकला पर्याय देऊन पूर्ण इको फ्रेंडली बनविले जातात म्हणजे यामुळे निसर्ग पण वाचणार आणि शेतकऱ्यांचा शाश्वत उत्पनाचा सोर्स ही बांबू तयार करणार येवढ्या चांगल्या पिकाची १५००० रोपांची लागवड करून श्री किशोर जी बाफना या उद्योगपतीने धुळे जिल्ह्यामध्ये एक निसर्गप्रेमी होण्याचा मान मिळवून एक वेगळाच संदेश जनतेसमोर दिला आहे यांनी ज्यांच्याकडून बांबूची टिशू कल्चर रोप घेतली असे अग्रिहिता पर्यावरण रक्षक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक, चेअरमन श्री रणजितजी गुळवे सर संस्थेचे संस्थापक,सीएमओ श्री प्रशांत जी नागणे तसेच संस्थापक, पुणे जिल्हा क्लस्टर हेड श्री डी एस पवार सर , संस्थापक,सातारा जिल्हा क्लस्टर हेड श्री आप्पासाहेब बरकडे सर, धुळे जिल्हा क्लस्टर हेड श्री संतोष भापकर सर, सोलापूर क्लस्टर हेड श्री बाळासाहेब लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बांबूची लागवड करण्यात आली आणि ही लागवड झाल्यानंतर गावच्या सरपंच माझी यांनी अग्रिहिता परिवाराचे आभार मानले आणि यापुढेही बाकी शेतकऱ्यांना असेच मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.






