आशाताई बच्छाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-राज्यातील.. स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra local body elections)ठरलेल्या वेळेतच होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली (Supreme Court on Zilla Parishad Elections) जाणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. काही दिवसांत जिल्हा परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे समजतेय. (Supreme Court on 50% reservation breach in Maharashtra local body elections) सोमवारी आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडली, त्या ठिकाणी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद –
नंदुरबार 100%
पालघर 93%
गडचिरोली 78%
नाशिक 71%
धुळे 73%
अमरावती 66%
चंद्रपूर 63%
यवतमाळ 59%
अकोला 58%
नागपूर 57%
ठाणे 57%
गोंदिया 57%
वाशिम 56%,
नांदेड 56%
हिंगोली 54%
वर्धा 54%
जळगाव 54%
भंडारा 52%
लातूर 52%
बुलढाणा 52%






