Home बुलढाणा उबर्डी–मोमिनाबादच्या सतीष जवंजाळ यांची ‘युवा मराठा महासंघ’ संग्रामपूर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती

उबर्डी–मोमिनाबादच्या सतीष जवंजाळ यांची ‘युवा मराठा महासंघ’ संग्रामपूर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती

180

आशाताई बच्छाव

1002211073.jpg

उबर्डी–मोमिनाबादच्या सतीष जवंजाळ यांची ‘युवा मराठा महासंघ’ संग्रामपूर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती.                                                       संग्रामपूर बुलढाणा स्वप्नील देशमुख –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीस अनुसरून आणि युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र राऊत पाटील यांच्या आदेशाने, उबर्डी–मोमिनाबाद येथील श्री. सतीष जवंजाळ यांची युवा मराठा महासंघ, संग्रामपूर तालुका कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताना संघटनेने त्यांच्या नेतृत्वगुणांचे, समाजाभिमुख कार्याचे, युवकांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण धडपडीचे आणि संघटनाप्रती असलेल्या निष्ठेचे विशेष कौतुक केले. या मूल्यांना सन्मान देत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.

संग्रामपूर तालुक्यात युवकांना योग्य दिशा देणे, संघटन बांधणी अधिक मजबूत करणे आणि अठरा पगड जातीच्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन कार्यरत राहणे— अशी अपेक्षा नवीन कार्याध्यक्षांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे निवेदन संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र राऊत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. स्वप्निल बापू देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर दांदळे पाटील यांनी प्रसिद्ध केले.

युवा मराठा महासंघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष कैलाश कडाळे पाटील यांनीही सतीष जवंजाळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.