Home जालना सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी  देऊ-अरविंद चव्हाण    मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा...

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी  देऊ-अरविंद चव्हाण    मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

97

आशाताई बच्छाव

1002166060.jpg

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी  देऊ-अरविंद चव्हाण

मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- जालना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सामाजिक कामात अग्रसेर असणार्‍या युवकांना जनतेची सेवा करण्याची संधी देऊ अशी गवाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी दिली गुरुवार रोजी पक्ष जिल्हा  कार्यालयात शहरातील मोदीखाना भागातील युवकांची जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी श्री चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केल. ज्ञानेश्वर शिरसागर, युवक सामाजिक कार्यकर्ते योगेश हिवाळे, सचिन अमोल गोणे, दुर्गेश काटकर,कार्तिक खडेवार,अक्षय गोणेकर, बबलू लोळगे, कैलास कदम अशोक नवपुते, राम खरात,यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष  माजी आमदार अरविंद चव्हाण व शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी कार्यकर्त्यांचा  शाल, पुष्पहार घालून स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleमहत्त्वाचे निवडणूक २०२५-२६ उमेदवार बांधवांनो लक्ष द्या!
Next articleराज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.