Home उतर महाराष्ट्र दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम उपस्थिती !     

दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम उपस्थिती !     

189

आशाताई बच्छाव

1002160702.jpg

दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम उपस्थिती !      श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थित राहून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध घटकांतील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक, वादक आणि कलाकारांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने वातावरण रंगले. त्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

यानिमित्ताने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.