आशाताई बच्छाव
अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या वाहनामध्ये रिफिलिंग करणारा आरोपी 32,450/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
——————————————————–अहिल्यानगर, प्रतिनिधी दिपक कदम
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 26/10/2025 रोजी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत, एक इसम अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर जाणारे रोडवरील बैरागी वॉसिंग सेंटरचे पाठीमागे मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला घरगुती गॅस टाक्या वाहनामध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगुन गॅस विना परवाना चोरुन विक्री करत करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ दिपक मेढे व पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश लबडे, बाळासाहेब नागरगोजे, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव अशांचे पथक नेमुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
वर नमुद स्थागुशा पथकाने तात्काळ नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर जाणारे रोडवरील बैरागी वॉसिंग सेंटरचे पाठीमागे मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला 1 इसम घरगुती गॅस टाक्या वाहनामध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगतांना दिसुन आला. पथकाची खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकुन इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सतिष आनंद टेकाळे वय- 32 वर्षे रा. नालेगांव, अहिल्यानगर ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमास मिळुन आलेल्या घरगुती गॅस टाक्या वापर व त्याचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगुन सदर गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरत असल्याचे सांगितले. पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करुन 10,000/- रुपये कि.ची एक इलेक्ट्रीक मोटार त्यास गॅस रिप्लींग करीता लागणारे पाईप, 4000/- रु. कि. चा एक इलेक्ट्रीक वजन टाका, 18450/- रुपये कि.चे एच.पी., इडियन व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या 9 रिकाम्या गॅस टाक्या, असा एकुण 32,450/- रुपये किमतीची मुद्देमाल ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, इडियन, भारत व एच. पी. गॅस कंपनीच्या गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कोतवाली पो.स्टे. गु.र.नं. 985/2024 भारतीय न्याय संहिता कलम 125, 287, 288 सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.






