Home नांदेड नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन.

नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन.

329

आशाताई बच्छाव

1002112587.jpg

नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड शहरात जुना कौठा येथील श्री साईबाबा मंदिर सभागृह येथे दि.२६ आक्टो.२०२५ रोजी सकाळी १० वाजता आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गत आठ वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, रक्तदान शिबिर,एक साधक एक वृक्ष या उपक्रमाबरोबरच पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या निवासासाठी धर्मशाळा उभारण्याचे काम सुद्धा संस्थेने हाती घेतले आहे आणि त्या धर्मशाळेचा बांधकामास सुरुवातही झाली आहे. या संस्थेला अतिशय अल्पावधीमध्ये महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम ज्या सदभक्तांनी केलं त्या सर्वांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीने दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रविवार रोजी साईबाबा मंदिर सभागृह जुना कौठा नांदेड येथे ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही त्याच दिवशी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री जगन्नाथ चक्रवार सावकार तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मिरकुटे,सचिव बालाजी पा. शिंदे व समस्त नांदेड जिल्हा शाखा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
असे प्रसिध्दी पत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र प्रसिद्धि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिले

Previous articleनांदेडमध्ये अनोखी भाऊबीज अपंग अनाथांना मिळाला सणाचा खरा आनंद.
Next articleदैनिक युवा मराठा चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना साई जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.