Home नांदेड नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज अपंग अनाथांना मिळाला सणाचा खरा आनंद.

नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज अपंग अनाथांना मिळाला सणाचा खरा आनंद.

222

आशाताई बच्छाव

1002112493.jpg

नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज अपंग अनाथांना मिळाला सणाचा खरा आनंद.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

भ्रमिष्ट, अपंग, भिकारी आणि अनाथ बालकांना सुशिक्षित महिलांनी ओवाळणी करून या वर्षीची भाऊबीज संस्मरणीय केली. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींकडून ओवाळणी करून घेऊन त्यांना भाऊबीजेची अनोखी भेट दिली.आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करण्याची संधी मिळालेल्या या उपेक्षितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ठाकूर यांच्या या कल्पक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चौकटीतील मजकूर
——————————
# पहिली अनोखी भाऊबीज – नांदेडचा हृदयस्पर्शी उपक्रम! 🌸

# धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कल्पनेतून उपेक्षित, अपंग आणि अनाथ मुलींना आयुष्यातील पहिल्यांदाच साजरी करता आली भाऊबीज

# या भावनिक क्षणांनी सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले!
——————————
भाऊबीज हा भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा सण असला तरी समाजातील अनेकांना त्याचा कधी अनुभवच आलेला नव्हता. दिवाळीच्या प्रारंभी फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनराज मंत्री आणि ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने अनाथ मुला-मुलींना फटाके, नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी एका मुलीने “आम्ही कधी कोणाला ओवाळलेच नाही” अशी खंत व्यक्त केली होती. या भावनेतूनच हा अभिनव उपक्रम साकारला गेला.

भाऊबीजेच्या दिवशी सकाळी “भाऊच्या माणुसकीच्या फ्रिज” येथे आयोजित कार्यक्रमात राजस्थानी महिला मंडळाच्या शांता काबरा, गायत्री तोष्णीवाल, संध्या छापरवाल, सविता काबरा तसेच जयश्री ठाकूर, सुषमा हुरणे आणि मंगल करडखेले यांनी भ्रमिष्ट, अपंग व कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना तिलक लावून, राखी बांधून ओवाळले. त्यानंतर फटाके फोडले गेले व मिठाई, जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. या दृश्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले.

यानंतर सुमन बालगृहात दिलीप ठाकूर यांनी मुलींकडून ओवाळणी करून घेतली आणि त्यांना रोख रक्कम, मिठाई व फटाके दिले. वासवी क्लबच्या सदस्यांनी मुलींना वही-पेन आणि गोड जेवण दिले. “आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करताना आम्ही कसे ओवाळायचे हेच शिकलो,” असे सांगताना मुलींच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले.

या उपक्रमात उपेक्षितांची दिवाळी साजरी करण्यासाठी रुपेश वट्टमवार ,स्नेहलता जायस्वाल, अविनाश चिंतावार मुंबई , सुरेश पळशीकर, सुरेखा राहाटिकर,
योगेश जायस्वाल , सतीश सुगनचंदजी शर्मा, चंद्रकांत गंजेवार , मोहित आणि रेणुका सोनी प्रांश अक्षय गोधमगांवकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ज्योती रामेश्वर वाघमारे , शोभा नंदलवार,अशोक गंजेवार,
प्राचार्य सुधीर शिवणीकर ,दुसऱ्यांदा रुपेश वट्टमवार,धनराज मंत्री व दोन अज्ञात दात्यांचे यांचे योगदान योगदान लाभले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, अरुण काबरा, सुरेश शर्मा, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

नांदेडमध्ये समाजातील उपेक्षित घटकांना प्रेम, आपुलकी आणि सणाची अनुभूती देणारा हा उपक्रम मानवतेचा खरा उत्सव ठरला आहे.
(छायाचित्र : संघरत्न पवार)

 

1नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज : उपेक्षित, अपंग आणि अनाथांना मिळाला सणाचा आनंद.

Previous articleYuva Maratha 18 to 24 Oct 2025
Next articleनांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.