आशाताई बच्छाव
जि.प.,पं.स., महानगरपालिका निवडणूका जाहीर , इच्छूक उमेदवारांत उत्साहाचे वातावरण
(राजेंद्र पाटील राऊत
मालेगाव: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,आणि महानगरपालिका निवडणूका जाहीर करण्यात आल्या असून,सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार वेळेवरच निवडणूका घ्याव्या लागणार आहेत.
ब-याच कालावधीपासून निवडणुका न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि महानगरपालिका यांच्या निवडणूका आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ अगोदर घेण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
दरम्यान १३ आँक्टोबर रोजी आरक्षण सोडत निश्चित झाल्यानंतर उत्साही व इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.