आशाताई बच्छाव
पातुर्ड्यात “सेवा पंधरवाडा” अंतर्गत महाराजस्व अभियान शिबिर; शेतकऱ्यांना लाभांचे झरा!
✍🏻स्वप्निल देशमुख
पातुर्डा (ता. संग्रामपूर) – छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” निमित्ताने पातुर्ड्यात आयोजित महाराजस्व समाधान शिबिर 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला कर्मयोद्धा आमदार संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी केले गेले.
शिबिराच्या दिवशी माननीय तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार शिंदे, तांबरे साहेब, ग्राम महसूल अधिकारी जगताप, पातुर्डा बु सरपंच रंणजीत गगंतीरे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव अवचार पाटील, खरेदी विक्री संघ अध्यक्ष विश्वासराव वरणकर, तालुका आरोग्य अधिकारी मारोडे यांसह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शिबिरात शेतकऱ्यांना सनद, दाखले, जाती प्रमाणपत्र, धनादेश, जिवंत सातबारा यासारखी विविध कागदपत्रे माननीय आमदार साहेबांच्या हस्ते वितरित केली गेली. यावेळी महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, सेतू केंद्र, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन व समाजकल्याण अशा विभागांमधील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे लाभार्थ्यांना थेट फायदा झाला.
शिबिराचे यश माननीय तहसीलदार साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाने साधले गेले. उपस्थित शेतकरी लाभार्थ्यांनी शिबिराच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले व शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी शिबिरात सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुगम, प्रभावी आणि लाभार्थ्यांसाठी अत्यंत फलदायी ठरला,
शेतकरी सक्षमीकरण, नागरिक सुविधा आणि सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ – या शिबिराने पुन्हा सिद्ध केले की शासन व लोकप्रतिनिधींचे सहकार्य शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचे आहे!






