आशाताई बच्छाव
महिला किर्तनकार हभप सौ सविताताई पारखे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर
नवरात्रीनिमित्त ५१ नवदुर्गांना २७ सप्टेंबर रोजी गौरविले जाणार
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या चांदवड तालुक्यातील तांगडी (शिरुर) येथील महिला प्रवचनकार ,किर्तनकार हभप सौ सविताताई दतात्रय पारखे यांना मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नाशिक येथे २७ सप्टेंबर रोजी डॉ शेफाली भुजबळ व नामवंत मान्यवरांच्या शुभहस्ते नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहिती मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघा राजेश शिंपी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करत असलेल्या वारकरी मंच महाराष्ट्र राज्य चांदवड तालुका महिला वारकरी मंच तालुका अध्यक्ष म्हणून हभप सौ सविताताई पारखे कार्यरत असुन किर्तन, प्रवचनातून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसारासाठी समाज प्रबोधन करत आहेत. अद्याप पावेतो समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार अमरावती आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ नवदुर्गांना मानाचा व सन्मानाच्या नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघाताई राजेश शिंपी, कायदेशीर सल्लागार ॲड विनया नागरे, कार्याध्यक्ष मीराताई ज्ञानेश्वर आवारे विभाग प्रमुख मनसे नासिक रोड यांनी दिली आहे.
मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने नवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २७ सप्टेंबर रोजी नवदुर्गा पुरस्कार दीपलक्ष्मी मंगल कार्यालय हिरावाडी रोड, पंचवटी नाशिक येथे आयोजित केला आहे. ज्या महिला विविध क्षेत्रात कार्य करतात किंवा घरचे काम पण तारेवरची कसरत असते अशा माता साठी ५१ नवदुर्गांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॉफी,सर्टिफिकेट, ओटी भरून पूजन करणे आणि नाश्ता देण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी मंजु जाखाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.






