Home सामाजिक आत्मविश्वास हेच आपल्या जीवनातील सर्वोत्तम बलस्थान

आत्मविश्वास हेच आपल्या जीवनातील सर्वोत्तम बलस्थान

122

आशाताई बच्छाव

1001989758.jpg

आत्मविश्वास हेच आपल्या जीवनातील सर्वोत्तम बलस्थान

आत्मविश्वास हि जीवनातील सगळ्यात मोठी सिद्धी असुन जीवनातील खुप मोठी सकारात्मक उर्जा आहे. आत्मविश्वास जागृत असणं हि सगळ्यात मोठी उपलब्धी असते. हाच आत्मविश्वास आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. पण आत्मविश्वासाला जर अंहकाराचा वारा लागला तर मग मात्र यशाचं अपयशात कधी रूपांतर होत ते कळत देखील नाही. किंवा अगदी अगदी हाकेच्या अंतरावर आलेल यश सुद्धा निसटून जात .म्हणून जीवनात आत्मविश्वास हा सदैव असला पाहिजे परंतु त्याच रूपांतर हे फाजिल आत्मविश्वासात होऊ नये किंवा त्याला अंहाकाराचा वारा लागु देऊ नये. हाच जीवनातील यशाचा महत्वपूर्ण मंत्र आहे. सृष्टी वरील प्रत्येक जीव प्राणी यांना विविध घटना क्रमावर घडामोडी सह दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या विविध, समस्यावर, वादळांवर नैसर्गिक अनैसर्गिक संकटावर यथा योग्य मार्ग काढण्यासाठी तसेच जीवनपथ यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी आत्मविश्वास हा अंत्यत महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे. आत्मविश्वासासारखी दुसरी अदभुत अद्वितीय, बलशाली शक्ति नाही. आपल्या जीवनातील सगळ्यात मोठं बलस्थान हे आत्मविश्वासच आहे. परंतु याच आत्मविश्वासाला जर अंहकाराची झालर लागली तर मग मात्र त्याच फाजिल आत्मविश्वासामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही आपण मग किती हि बलशाली, सामर्थ्यवान दिग्गज महा दिग्गज परम प्रतापी व्यक्ती असलो. तरी सुद्धा आपल्या अगदी टप्यात दृष्टिक्षेपात आलेलं यश देखिल आपल्या पासून दूर जात. आणि क्षणातच होत्याचं नव्हतं होत परिणाम स्वरूप आपल्यावर मनोमन पश्चात्ताप करण्याची वेळ उद्भवते. म्हणून आत्मविश्वास असलाच पाहिजे या मध्ये दुमत नाही परंतु तो जीवनात आत्मविश्वास फाजिल नसला पाहिजे हे हि तितकच खर आहे आपण एक गोष्ट जाणुन आहेत जीवनाच्या एखाद्या टप्यावर वळणावर आपल्याला एखाद्या मोठ यश मिळालं तर त्या यशा बद्दल गर्व, अंहकार, अभिमान न बाळगता आत्मविश्वास ठेवून प्रयत्न केले तर मिळालेल्या यशापेक्षा ही मोठं यश आपण नक्कीच संपादन करू शकतो.

रामभाऊ आवारे
प्रदेश प्रसिद्धीप्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य