Home पुणे श्रीमद्भगवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक व सन्मानपत्र वितरण सोहळा

श्रीमद्भगवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक व सन्मानपत्र वितरण सोहळा

78

आशाताई बच्छाव

1001989462.jpg

श्रीमद्भगवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक व सन्मानपत्र वितरण सोहळा
उरुळी कांचन पुणे,(प्रतिनिधी सुर्यकांत भोर):- सत्य, अहिंसा, समानता, मानवप्रबोधन व्यसनमुक्ती या श्रीमद्भवतगीतेच्या पंचतत्वाचा, तथा महाराष्ट्र शासनाच्या मूल्यशिक्षण धोरणांतर्गत प्रचार व प्रसार करून मानव जातीला सुसंस्कारित करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून, पंचकृष्ण प्रबोधन परीषद जाळीचा देव व श्रीकृष्ण ज्ञान मंदिर चौधरी वस्ती उरुळी कांचन, महंत श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम महात्मा गांधी महाविद्यालय उरुळी कांचन येथे एक महिन्यापुर्वी श्रीमद्भवतगीता ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेत एक्कावन्न विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. सदर परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला त्या अनुषंगाने आज महात्मा गांधी महाविद्यालय उरुळी कांचन येथे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. त्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. त्यात मुस्लिम समाजाच्या मुलानेही श्रीमद्भवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेत भाग घेवुन उत्तम गुण मिळवून पारितोषिक व सन्मानपत्र मिळवून आपल्याकडे असलेला सर्व धर्म समभाव दाखवून देत आपल्या बुध्दीकौशल्यातुन पटवून दीले त्याचाही विषेश सन्मान करण्यात आला. तसेच हा उपक्रम राबवत असतांना विषेश परीश्रम घेणारे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे धर्माप्रती तळमळ असणारे पत्रकार अमोल भोसले यांचा महाराष्ट्र शासन व पंचकृष्ण प्रबोधन परीषद व महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचे वतीने विशेष सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव, प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य विलास काशिद, पर्यवेकक्षिका संगिता शिर्के, दादासाहेब यादव, विमल कांचन, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअपर तहसिल कार्यालयात 6 ऑक्टोबर रोजी जप्त केलेल्या मिळकतींचा जाहीर लिलाव :अप्पर तहसीलदार ज्योती देवरे
Next articleशेतकऱ्याचा भावनिक प्रश्न दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जो भाव होता… तोच भाव आजही आहे!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.