Home जालना मंडळ अधिकारी व तलाठी चोऱ्हाळा येथील पानदन रस्त्याची पाहणी करत असताना दोन...

मंडळ अधिकारी व तलाठी चोऱ्हाळा येथील पानदन रस्त्याची पाहणी करत असताना दोन गटातील शेतकऱ्यात वादाची ठिणगी 

441

आशाताई बच्छाव

1001982168.jpg

मंडळ अधिकारी व तलाठी चोऱ्हाळा येथील पानदन रस्त्याची पाहणी करत असताना दोन गटातील शेतकऱ्यात वादाची ठिणगी
गजेंद्र लोखंडे तालूका प्रतिनिधी भोकरदन
राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते व पानदन रस्त्याचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनामार्फत सेवा पंधरवाडा हे अभियान राबविण्यात येत आहे याच अभियानांतर्गत सदरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा म्हणून या रस्त्याची निवड करण्यात आली आहे आणि हा रस्ता नकाशा वर सुद्धा पूर्वीपासून आहे याच रस्त्याने पुढे शंभर ते दीडशे शेतकरी आपल्या शेतात याच रस्त्याने पूर्वीपासून येणं जाणं करतात अशा सर्व शेतकऱ्यांनी पैसा जमा करून स्वतःच्या पैशाने दोन ते तीन लाख रुपये खर्च करून रस्त्यावरती मुरूम टाकून रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आलेले आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेले हा चांगला निर्णय असून शेतकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा व रस्त्यावरून वाद होऊ नये म्हणून ह्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे परंतु अश्या या निर्णयाविरुद्ध काही समाजकंटक वाद निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रकार चोऱ्हाळा या गावी झालेला आहे तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर खडक कारवाई करण्यात यावी असे नागरिकांच्या वतीने बोलल्या जात आहे मौजे चोराळा व मासनपूर ग्रुप ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली होती व त्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक पांदण रस्त्याला नंबरिंग देण्यासाठी या रस्त्याची नोंदणी करण्यात आली होती व तसा ठराव सुद्धा पारित झालेला होता परंतु काही शेतकरी यांनी चालू असलेल्या रस्त्यामध्ये दगड व काट्याकुट्या आणून टाकले असल्यामुळे त्या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे रस्ता खुला करून देण्यात यावा असे निवेदन दिले होते याच निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना स्थळ पाणी करण्यासाठी पाठविलेले होते परंतु या ठिकाणी सदरील शेतकऱ्यांनी या ठिकाणी दगड टाकल्याची त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी विचारणा केली असता दोन गटामध्येच बाचावाची सुरू झाली व त्या ठिकाणाहून मंडळ अधिकारी व तलाठी यांनी माघारी येण्याचा निर्णय घेतला तसेच त्या रस्त्याने आपल्या शेतात जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी परत तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार यांच्या सदरील प्रकार निदर्शनास आणून दिला तहसीलदार ने त्यांना आश्वासन दिले असून दिनांक 24 रोजी सदरील स्वतः मी स्थळ पाणी करणारा असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले

Previous articleमिनल हागेची दमदार झुंज – विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई
Next articleवाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांने शेतीत अनोखा उपक्रम करीत ४० दिवसांत कमावले दोन लाखांचे उत्पन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.