Home जालना खंजर बाळगून दहशत निर्माण करणारे दोन आरोपीस केले जेरबंद – स्थानिक गुन्हे...

खंजर बाळगून दहशत निर्माण करणारे दोन आरोपीस केले जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

170

आशाताई बच्छाव

1001928638.jpg

खंजर बाळगून दहशत निर्माण करणारे दोन आरोपीस केले जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
चंदनझिरा ,जालना येथे खंजर बाळगून इंस्टाग्रामवर रील बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपींतांना ताब्यात घेणेबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक ०८/०९/२०२५ रोजी १)सचिन कैलास गायकवाड वय २१वर्षे राहणार एकता चौक चंदनझिरा जिल्हा जालना २) सचिन शिवाजी जाधव वय २५ वर्ष रा. एकता चौक चंदनझिरा जि. जालना यांना इंद्रायणी हॉटेल परिसर चंदंजिरा जालना इथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक धारदार व तीक्ष्ण खंजर व इंस्टाग्राम व्हिडिओ बनवण्यासाठी व व्हायरल करण्यासाठी वापरलेला मोबाईल असा एकूण रु.४०००/- हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी त्यांनी दिनांक ०४/०९/२०२५ रोजी चंदन जीरा येथे मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमांमध्ये धारदार व तीक्ष्ण खंजरसह नाचून त्याचा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्राम वर पोस्ट करून जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती त्यामुळे दोन्हीही आरोपीतांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाणे जालना येथे सरकारतर्फ फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि.योगेश उबाळे ,सपोनी सचिन खामगळ,राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ ,सागर बाविस्कर, संदीप चिंचाले ,गणपत पवार यांनी केली आहे.

Previous articleजाफराबाद तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना तेली सेना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान
Next articleव-हाणेचे माजी सरपंच दयाराम वाघ यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.