आशाताई बच्छाव
गाईची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कसायासह त्याच्या साथीदारांना सदर बाजार पोलिसांनी केली अटक
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 01/09/2025 रोजी सोशल मीडियावर तीन इसम गोवंश जातीचे प्राणी कापतानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे व्हिडिओ मधील तीन इसम पैकी एक असलम मेहमूद कुरेशी राहणार मंगळ बाजार जालना व दोन अनोळखी इसमान विरुद्ध गुरनं. 745/ 2025 कलम 299, 3(5) बीएनएस सह कलम 5(क)9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी असलम कुरेशी व त्याचे साथीदार फरार होते.
सदर गुहयातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सदर बाजार जालना व स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील वेगवेगळे चार पथके आरोपींच्या अटकेसाठी बाहेर राज्यात हैदराबाद तसेच खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर मानवत,पाथरी, परभणी रवाना करण्यात आले होते यावरून पोलीस पोलीस ठाणे सदर बाजार जालना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यतील उर्वरित दोन आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपी हे फरक असल्याने त्यांचा तांत्रिक विश्लेषण आधारे व गोपनीय माहिती नुसार सदर आरोपी याचे ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर बाजार डीबी पथकाने यातील मुख्य आरोपी असलम कुरेशी व सिफिया शेख समद रा चमडाबाजार जालना यांना सदर ठिकाणाहून ताब्यात घेतले तसेच यासीन रशीद कुरेशी रा.राजनी ता. घनसावंगी याचे ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणाहून आरोपीस ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीता विरुद्ध संघटित गुन्हेगारी तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत कलम वाढ करून पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष्मान नोपाणी साहेब मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांचे नेतृत्वात सपोनी. श्री उबाळे( स्थागुशा )डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के,पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन सानप,पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी,पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी कावळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवहरी दिघोळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा हरणे,पोलीस हेडकॉन्स्टेबल नजीर पटेल, शाखा गुन्हे शाखा चे पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत आडेप, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश श्रीनिवास, प्रशांत लोखंडे, म.पोलीस हेड कॉन्स्टेबल शारदा गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ,पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफने,पोलीस कॉन्स्टेबल अजीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम,पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज भोसले व चालक मोहन हिवाळे कल्पेश पाटील सद्दाम सय्यद यांचे मदतीने केली .






