Home वाशिम शिक्षक दिन उत्साहात साजरा कै. दौलतराव पाटील इंग्लिश स्कूल, बेलोरा

शिक्षक दिन उत्साहात साजरा कै. दौलतराव पाटील इंग्लिश स्कूल, बेलोरा

426
0

आशाताई बच्छाव

1001924959.jpg

शिक्षक दिन उत्साहात साजरा
कै. दौलतराव पाटील इंग्लिश स्कूल, बेलोरा
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ –बेलोरा येथील कै. दौलतराव पाटील इंग्लिश स्कूल येथे 05 सप्टेंबर हा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेचे सर्व कामकाज छात्रशिक्षकांनी स्वतः चालविले. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून अध्यापणाचे कार्य करत शिक्षकांचे महत्व जाणून घेतले. याप्रसंगी कु. अनवी करेवार (8वी) या मुलीने मुख्याध्यापक पद स्वीकारले तर कु. दिव्या जाधव (7वी) या मुलीने उपमुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारली. तसेच पर्यवेक्षकाची जबाबदारी वरद मस्के (8वी) यांनी स्वीकारली. या कार्यक्रमाप्रसंगी निवडक छात्रशिक्षकांनी सहभाग घेऊन आपणावर सोपविलेले काम व्यवस्थितपणे पूर्ण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व इत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Previous articleमाहोरा तान्हाजी नगर येथील गणपती विसर्जन ऐकतेचा संदेश देत आनंदात संपन्न
Next articleअँड.जयश्री बी सोनवणे यांना राज्यस्तरीय “झाशीची राणी लक्ष्मीबाई ” पुरस्कार प्रदान *
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here