Home वाशिम मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी.

मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी.

365

आशाताई बच्छाव

1001762638.jpg

मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी.

सततच्या पावसामुळे संत्राला मृग बहार धरला नाही…

मुंगळा / वाशिम प्रतिनिधी गोपाल तिवारी:- मुंगळा परिसरात मागील तीन वर्षापासून वेळोवेळी आलेल्या पावसामुळे संत्रा उत्पादक अडचणीत सापडला आहे मागील वर्षी मे महिन्यात सतत पाऊस सुरू असल्यामुळे मृगबहाराला फटका बसला आहे.यामुळे मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला असून शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे मुंगळा येथील जगदंबा बचत गटाने निवेदनाद्वारे केली आहे.

मुंगळा परिसरात जवळपास ६००ते ७०० हेक्टर संत्रा लागवड असून मुंगळा येथील शेतकऱ्याचे संत्रा हे मुख्य पीक आहे व संत्रा बहार निसर्गावर अवलंबून असून केव्हा निसर्ग शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालेल याला सांगता येत नाही. असाच प्रकार मुंगळा येथील संत्रा उत्पादकाचा झाला आहे.

नुकतेच संत्राचे उन्हाळी पाणी बंद करून संत्रा बागा में महिन्यात तानावर सोडल्या होत्या. परंतु मागील तीन वर्षापासून वेळेअवेळी आलेल्या पावसाचा फटका मृग बहाराला बसत आहे.तसेच यावर्षी में महिन्यात सतत १महिना संतत पाऊस सुरू होता. यामुळेच संत्रा मृग बहाराला बसला असून येथील तसेच मालेगाव तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक अडचणीत सापडला आहे तरी शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जगदंबा कृषी बचत गटाने रिसोड मालेगाव चे आमदार अमित झनक तसेच जिल्हा अधिकारी, तहसीलदार मालेगाव यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी जगदंबा बचत गाटाचे शेतकरी प्रकाश राऊत, गजानन केळे,अनंद नाईक, जनार्दन जायभाये, संदिप बोबडे, भागवत मोहळे, संतोष बबन राऊत, सिदेश्र्वर केळे,तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते….

Previous articleअखेर १९ दिवसांपासून फरार आरोपी डॉ. देवेश अग्रवाल झाला पोलिसांसमोर सरेंडर
Next articleदभाषी फाट्यावर एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात दोन प्रवाशी ठार तर २६ जण जखमी; मृतांमध्ये बालिकेचा समावेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.