आशाताई बच्छाव
रामभाऊ आवारे यांना आस्था सामाजिक संस्थेचा महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार जाहीर
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने लवकरच शानदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
दैनिक युवा मराठा
राजेंद्र पाटील राऊत मालेगाव
महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे स्टार प्रचारक म्हणून नावलौकिक मिळविलेले, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे मुख्य संचालक, अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या दैनिक युवा मराठा चे निफाड नाशिक तालुका प्रतिनिधी तसेच नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व समाजाभिमुख वृत्तांकन करणारे पत्रकार श्री.रामभाऊ विठ्ठलराव आवारे वनसगाव (निफाड) नाशिक यांची “महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार 2025” साठी निवड झाली आहे अशी माहिती आस्था सामाजिक संस्था पालघर (वाडा) संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र भोईर यांनी दिली आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सत्य घटनांचे निर्भीड वार्तांकन व समाजातील प्रश्नांना आवाज देण्याचे धाडस या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली असून पत्रकार रामभाऊ आवारे सर यांना अद्याप पावेतो २४५ राज्यस्तरीय पुरस्कारांनी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१५ मध्ये दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने त्यांना राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली आहे.या निवडीबद्दल डॉ.वीरेंद्र भोईर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील शंभर निवडक पत्रकारांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर पत्रकार रामभाऊ आवारे यांची महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड होऊन त्यांना संस्थेच्या वतीने निवड पत्र मिळाले आहे.या निवडपत्रात त्यांनी म्हटले आहे की, पत्रकार रामभाऊ आवारे यांनी गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण व शहरी भागातील प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी दिलेला योगदान समाजासाठी दीपस्तंभ ठरणारे आहे. याप्रसंगी अनेक पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनीही रामभाऊ आवारे सर यांना शुभेच्छा दिल्या.समाजहिताचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अशा सन्मानामुळे नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी फोन मेसेज द्वारे शुभेच्छा दिल्या आहे.






