Yuva maratha news
नरडाण्यात ‘डिफेन्स हब’ व्हावा मंत्री जयकुमार रावल यांची मागणी
(केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट)
विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील
दोंडाईचा : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल ांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी धुळे जिल्ह्यातील नरडाणा ता. शिंदखेडा येथे ‘डिफेन्स हब’ स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीवर मंत्री राजनाथ सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे एमआयडीसी विकसित असून, डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर) मंजूर आहे, अनेक उद्योग याठिकाणी कार्यरत असून, औद्योगिक दृष्टिकोनातून नरडाणा परिसर अत्यंत पोषक मानला जातो. मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे याबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात नरडाणा येथे डिफेन्स हबसाठी आवश्यक प्रशस्त व मोकळी जागा उपलब्ध आहे, तापी नदी जवळच असल्याने भरपूर पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग येथूनच जात असल्याने रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी, मध्य व पश्चिम रेल्वेची उपलब्धता, यामुळे दळणवळण सुलभ होते, आधीपासूनच औद्योगिक वातावरण तयार असून, पायाभूत सुविधा सक्षम या सर्व बाबी लक्षात घेता, नरडाणा येथे ‘डिफेन्स हब’ मंजूर करणे हे केंद्र सरकारच्या संरक्षण उत्पादन स्वावलंबन धोरणाशी सुसंगत तरेल, असेही मंत्री रावल यांनी या भेटी दरम्यान नमूद केले. या सकारात्मक संवादामुळे नरडाणा परिसराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवीन गती मळण्याची शक्यता निर्माण झाली आहे






