Home बुलढाणा मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका ! – निकाल देणारे न्यायाधीश मूळचे...

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका ! – निकाल देणारे न्यायाधीश मूळचे बुलढाण्याचे !

175

आशाताई बच्छाव

1001778442.jpg

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका ! – निकाल देणारे न्यायाधीश मूळचे बुलढाण्याचे !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा महाराष्ट्राला हादरविणाऱ्या व 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला. या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निकाल
बुलढाणा येथील कमलनयन लाहोटी यांचे सुपुत्र तथा न्यायाधीश अभय कमलनयन लाहोटी यांनी दिला आहे.
सन 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी लागला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह
ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बुलढाणा येथील मूळचे रहिवासी असलेले न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल बुलढाणा येथील प्रसिद्ध उद्योजक कमलनयनजी लाहोटी यांचे पुत्र तथा उद्योजक अतुल लाहोटी, अजय लाहोटी यांचे बंधू न्यायाधीश अभय लाहोटी यांनी दिला आहे.

Previous articleपाच जणांनी घेरून भोसकले सनीला ! तीन दिवसांपासून मागावर होते…
Next articleॲड सुरेश जयवंतराव देसाई देगावकर यांचे निधन रविवारी देगाव येथे होणार अंत्यसंस्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.