Home जालना -शिवसेनेची मजबुत संघटन बांधणी करा – संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर

-शिवसेनेची मजबुत संघटन बांधणी करा – संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर

135

आशाताई बच्छाव

1001767035.jpg

-शिवसेनेची मजबुत संघटन बांधणी करा – संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर
निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी पक्षाची ताकद- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर
शिवसेनेच्या संर्कलनिहाय बैठका
जालना, दि. ३०(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती या
निवडणुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे या निवडणुका
जिंकण्यासाठी पक्ष संघटन मजबुत करावे लागणार असल्याचे सांगितले. पक्ष
संघटन गठीत करतांना पक्ष संघटनेतील सर्व रिक्तपदे भरावीत, शाखाप्रमुख,
केंद्रस्तरीय पदाधिकारी, बुथप्रमुख या सर्व नियुक्त्या करुन पक्ष मजबुत
करावा तरच आपण या सर्व निवडणुका चांगल्या प्रकारे लढू शकू, असे प्रतिपादन
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समित्या,निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी
जिल्ह्यातील सर्कल निहाय बैठकांचे आयोजन केले. आज ३० जुलै रोजी जालना
तालुक्यातील वाघ्रुळ, पिरकल्याण, जाफराबाद तालुक्यातील अकोला देव,
टेंभुर्णी, वरुड ब्रुद्रुक, सिपोरा अंभोरा या गटांच्या पदाधिकार्‍यांच्या
बैठका आयोजित केल्या होत्या. या सर्व बैठकांत भाषणांना फाटा देवून थेट
कार्यकर्त्यांशी घोसाळकर यांनी संवाद साधला.
यावेळी महिला आघाडी संपर्कप्रमुख ज्योतीताई ठाकरे, उपनेते लक्ष्मण वडले,
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,  जिल्हाप्रमुख महेश नळगे, माजी आमदार
संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, मुरलीधर शेजुळ, परमेश्वर
जगताप, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, किसान सेनेचे जिल्हा संघटक
मुरलीधर थेटे, तालुकाप्रमुख हरीहर शिंदे, कुंडलिक मुठ्ठे, महिला
आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल मेटकर, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.