आशाताई बच्छाव
कै. प्रमेश्वर बाबुराव पवार यांचे अपघाती निधन
जाफ्राबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की दिनांक 29/07/2025 रोजी वालसा वडाळा येथील कै. प्रमेश्वर बाबुराव पवार हे माहोरा भोकरदन रोडवर माहोरा येथून आपल्या गावी जात असतांना मध्यरात्री च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांना धडक एवढी जोराची होती की त्यांचे शरीर छिन्न विच्छिन्न झालेले होते. हा अपघात MSEB सब स्टेशन जवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलीस स्टेशन येथील पोलीस यांची गाडी घटना स्थळी दाखल झाली. त्यानी मृत देह उत्तर तपासणी साठी माहोरा येथील शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आला. पुढील चौकशी जाफ्राबाद पोलीस स्टेशन करत आहे.