Home नाशिक दहिवड शिवारात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद

दहिवड शिवारात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद

183

आशाताई बच्छाव

1001762464.jpg

दहिवड शिवारात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळा परिसरात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करीत पशुधन ठार करणारा बिबट्या आज दिनांक 28 जुलै रोजी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला असून शेतकऱ्यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील दहिवड व उमराणे या गावांच्या सरहद्दीवर असलेल्या लवखाड मळा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती. सदर बिबट्याने शेतकऱ्यांच्या बकऱ्या, पाळीव कुत्री तसेच गोधनावर हल्ला चढवत त्यांना ठार केले होते. बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत होते.

त्या अनुषंगाने देवळा येथील वनपरिक्षेत्राधिकारी संतोष जाधव, वनपाल देविदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गंगाधर पवार, विजय पगार, नामदेव ठाकरे व वन कर्मचाऱ्यांच्या टीमने बिबट्याला पकडण्यासाठी दहिवड येथील शेतकरी तुकाराम दाजीबा पवार यांच्या शेत गट नंबर 196 मध्ये पिंजरा लावला होता, सदर पिंजऱ्यात आज दिनांक 28 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बिबट्या कैद झाला असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleमालेगावात महिला कर्मचाऱ्यांचा छळ झाल्याच्या तक्रारी,नंतर सारेच आलबेल!
Next articleसंजय गांधी योजना च्या ढिसाळ कारभारामुळे निराधार त्रस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.