Home पुणे पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

123
0

आशाताई बच्छाव

1001752129.jpg

पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

(यादवराव सावंत यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान)

पुणे–जी ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवड येथे संपन्न झाला.

शिंदखेडा जिल्हा धुळे येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने शाल, पुष्पगुछ, मेडल, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देवुन सहाय्यक आयुक्त महानगरपालिका पुणे वैशाली चव्हाण यांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरावरासह सहा जेष्ठ पत्रकारांना देवुन उत्तर महाराष्ट्रातुन एकमेव निवडीत यादवराव सावंत यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ. नितिन वाघमोडे, आयकर आयुक्त पुणे हे होते. तर अॅड. असीम सरोदे मुंबई उच्च न्यायालयातील कायदेतज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी विशेष उपस्थिती मा.श्री. अनिल भिमराव जाहीर, तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडेबाबा आश्रम, संख उपस्थिती होती. विशेष आकर्षण म्हणून वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालीका, राम मांडूरके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, ममता भोई खानदेशी अभिनेत्री, श्वेता परदेशी मिसेस इंडिया २०२२, इंटरनॅशनल मॉडेल, प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार / फेम आदीं खास उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक गोरड, कार्यध्यक्ष महादेव महानुर व पदाधिकारी उपस्थित होते. सदर सोहळा 26 जुलै 2025 ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे येथे शानदार संपन्न झाला. शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना पुरस्कार प्रदान झाल्यानंतर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

Previous articleभोकरदन तालुक्याची व्यथाच न्यारी शासकीय कार्यालयामध्ये वरिष्ठ पदी सर्व प्रभारी
Next articleडॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम: स्मृती दिन विशेष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here