Home सामाजिक डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम: स्मृती दिन विशेष

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम: स्मृती दिन विशेष

309

आशाताई बच्छाव

1001752137.jpg

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम: स्मृती दिन विशेष

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तमिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे एक नाविका आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते, तर आई अशियम्मा गृहिणी होती.
कलाम यांचे शालेय शिक्षण रामेश्वरममध्ये झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (ISRO) त्यांनी ‘एसएलव्ही-III’ या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यामुळे भारताला आपले उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याची क्षमता प्राप्त झाली.
त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्येही काम केले आणि अनेक क्षेपणास्त्र प्रकल्पांमध्ये मोलाची भूमिका बजावली. ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. २००२ ते २००७ या काळात त्यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून काम केले. ‘भारताला विकसित राष्ट्र बनवणे’ हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे ते विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक प्रेरणास्थान बनले.
२७ जुलै २०१५ रोजी त्यांचे शिलाँग येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे जीवन आणि कार्य नेहमीच भारतीयांना प्रेरणा देत राहील.

कुंदन कुमार जाधव सर
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव तालुका निफाड