Home जालना भोकरदन शहर व आसपासच्या परिसरामध्ये वरून राजाचे आगमन

भोकरदन शहर व आसपासच्या परिसरामध्ये वरून राजाचे आगमन

92

आशाताई बच्छाव

1001752082.jpg

भोकरदन शहर व आसपासच्या परिसरामध्ये वरून राजाचे आगमन
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यात व महाराष्ट्रात पावसाने सात ते आठ दिवसापासून विश्रांती घेतली होती परंतु आज सामान्य तापमानापेक्षा आजच्या तापमानामध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळत होते त्यामुळेच दमट वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली सायंकाळच्या वेळी साडेपाच ते सहा वाजता भोकरदन शहर व तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली या पावसाने शेतातील पिकांना जीवनदान मिळाले आहे शेतकरी राजा निराशा जनक परिस्थितीमध्ये पहावयास मिळत होता परंतु वरून राजाने आज हजेरी दिल्याने शेतकऱ्यांच्या पुढील आशा पल्लवी झाल्या आहे मिरची असो सोयाबीन मका अशी शेतात पेरलेली पिके सुखाला सुरुवात झाली होती एक हिंदी मध्ये म्हण आहे जिसका कोई नही उसका खुदा है यारो खरंच या मनीप्रमाणे त्या देवाला सर्वांची चिंता असते म्हणूनच ज्या ढगाकडे ज्या आकाशाकडे शेतकरी आतुरतेने या पावसाची वाट बघत होता त्या पावसाला कुठेतरी आज सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं येणारा हा पाऊस एक ते दोन दिवस सतत राहिला तर गोरगरीब शेतकरी यांचे पुढील सण हे आनंदात जातील व शेतकरी राजा आपला हा बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करेल.

Previous articleपिंपरी चिंचवड मध्ये सार्वजनिक आई कानबाई माता उत्सवाचे आयोजन 
Next articleस्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा या शाळेत विद्यार्थी संसद निवडणूक 2025 पार पडली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.