आशाताई बच्छाव
विरदेल येथील देवकर विद्यालयाचे शिक्षक गोसावी सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित…
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
विरदेल ता.शिंदखेडा येथील श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय सोमगीर गोसावी यांना ‘बी द चेंजेस फाउंडेशन’तर्फे राज्य आदर्श शिक्षक शिर्डी येथे आयोजित पुरस्कार कार्यक्रमात देऊन गौरव करण्यात आले… व त्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…..
हा पुरस्कार आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार आणि पोलिस उपनिरीक्षक भरत दाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराबद्दल शिंदखेडा तालुका दशनाम गोसावी समाजाच्या वतीने संजय गोसावी, गोसावी समाजाचे संचालक राजू गोसावी, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम गोसावी, तालुका अध्यक्ष किरण महंत, शहर अध्यक्ष अभिमान गोसावी, बाळू गोसावी, दिलीप भारती, उद्योजक अतुल साळवे, अमोल गोसावी, अभिजित गोसावी यांनी त्यांचा सत्कार सत्कार केला.