Home बुलढाणा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासीयांना भोगाव्या लागतात नरकयातना, आमचे जगणे मान्य नाही का :...

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासीयांना भोगाव्या लागतात नरकयातना, आमचे जगणे मान्य नाही का : ग्रामस्थांचा संतप्त सवाल

89

आशाताई बच्छाव

1001709194.jpg

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासीयांना भोगाव्या लागतात नरकयातना, आमचे जगणे मान्य नाही का : ग्रामस्थांचा संतप्त सवाल
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीप संजय पन्हाळकर
बुलडाणा:- सिंदखेड राजा सरकारव्दारे ग्रामविकासातून राज्याचा विकास साधाण्याच्या बाता हाकण्यात येत असल्यातरी प्रत्यक्षात मात्र, अनेक गावे स्वातंत्र्याय पंचाहत्तरी नंतरही
दुर्लक्षीतपणाचा कलंक भाळी मिळवत आहेत. यातील एक गाव असलेल्या लिंगा-काटे पांग्री येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या रस्ते, नाली, पाणी यासारख्या माफक मुलभूत सुविधांपासून अक्षरशः वंचित आहेत. केवळ नावापुरते असलेल्या इथल्या ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे या गावातील नागरिक नरकयातना भोगत आहेत. त्यात शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही कमालीची अनास्था पाहता ‘आमचेही जगणे मान्य करा?’, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा-काटे पांग्री या गट ग्रामपंचायतीतील लिंगा या साधारणतः ७०० लोकसंख्येचे आडवळणी गाव. येथील बहुतांश नागरीकांचा उदरनिर्वाह शेतीवर अंवलंबून आहे. येथील ग्रामपंचायत केवळ शोभोची वास्तू ठरल्याने गावात साधा पक्का रस्ता देखील उरलेला नाही. पीण्याच्या पाण्याची सोय नाही. नाल्या नाहीत. याचा परिणाम येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. गावात अनेक वर्षांनंतर पाणीपुरवठ्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, ही पाईप लाईनसाठी गावातील काँक्रीटचा मुख्या रस्ता पूर्णपणे खोदून काढण्यात आला आहे. सोबतच गावातील नाल्या देखील नेस्तनाबूत झाल्या आहेत. दरम्यान पाईप लाईन टाकून मोठा कालावधी लोटला असतानाही रस्त्याच्या कामाकडे पूर्णतः दूर्लक्ष झाले असल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. गावातील सांडपाणी याच रस्त्यारून वाहते. परिणामी जागोजागी गटारे तुंबली आहेत. त्यामुळे मच्छर निर्माण होऊन रोगराई पसरण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे ज्या पाईपलाईनसाठी गावातील रस्ता खोदण्यात आली आहे ती पाईपलाईन देखील केवळ दिखावा ठरला आहे. गावातील नागरिकांना आजही विहीरींवरून पाणी आणावे लागत आहे. या समस्यांबाबत ग्रामस्थांमधून ओरड होत असानाही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे या गावातील नागरिक नरकयातना भोगत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी गावातील चालण्यायोग्य देखील राहीला नाही रस्ता. गावात कुणी आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यातही नेता येत नाही. विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची दखल घेवून गावातील मुलभूत सुविधांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी येथील बाळकृष्ण चके, सुनिल चेके, भानुदास पैठणे, पांडुरंग चेके, शंकर भालेराव, संजय गाढवे, उमेश भालेराव, ज्ञानेश्वर चेके, भारत चेके, अनंथा पैठणे, समाधान चेके, नवरत्न मानवतकर, लताबाई जाधव, सुरेश चेके, उध्दव चेके, संजय चेके, सचिन चेके, कैलास चेके, समाधान पैठणे, राधेश्याम शिंदे, पांडूरंग चेके, प्रदीप भालेराव, शिवानंद चेके, भारत चेके यांनी केली आहे.
ग्रामपंचायतीचे अक्षम्य दूर्लक्ष गावातील समस्यांबाबत ग्रामपंचायतीचे अक्षम्य दूर्लक्ष आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी ज्यांना सरपंचपदावर बसविले आहे ते सरपंच गावात राहतच

Previous articleएलसीबी पथकाची मोठी धडक – लोणारमध्ये ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एक जण अटकेत ! लोणार (जि. बुलढाणा)
Next articleहमारी अधूरी कहानी..!’ -हळदीच्या पूर्वसंध्येला भावी नवरदेवाचा रक्तरंजीत अपघात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.