Home उतर महाराष्ट्र १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याने शिंदखेडा भाजपा कडून फटाके फोडत...

१२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याने शिंदखेडा भाजपा कडून फटाके फोडत जल्लोष

96

आशाताई बच्छाव

1001709099.jpg

१२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याने शिंदखेडा भाजपा कडून फटाके फोडत जल्लोष

शिंदखेडा प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ जिंजी या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. हा सुवर्णक्षण शिंदखेडा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून फटाके फोडत भाजपातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, माजी नगरसेवक चेतन परमार, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, माजी शहराध्यक्ष अँड विनोद पाटील, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, बबलू देवरे, संजय मंगा माळी, गोपाल माळी, दादा मराठे, गोपाल चौधरी, सुभाष माळी, बबलू मराठे, गुलाब सोनवणे, देविदास माळी, मास्टर टेलर, भूपेंद्रसिंह राजपूत, राहुल महिरे, बरून कुमार आदींची उपस्थिती होती.

स्वराज्याची राजधानी रायगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, महाराजांनी ज्या किल्ल्यावर अफजलखानाला नेस्तनाबूत केले तो प्रतापगड, राजाचं जन्मस्थान शिवनेरी, स्वराज्याच्या नौदलाचं प्रमुख केंद्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता पायांचे उसे आहे तो सिंधुदुर्ग, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) या किल्यांचा हेरिटेजमध्ये समावेश झाला आहे.

Previous articleश्री क्षेत्र वनसगाव येथे वैष्णव (अध्यात्मिक) वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
Next articleअमरावती शहरात गुन्हे शाखा युनिटचा छापा, फेक मॅरेज पार्टी त ८0 अल्पवयीनसाह १७५ युवा युवतीचा समावेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.