आशाताई बच्छाव
श्री क्षेत्र वनसगाव येथे वैष्णव (अध्यात्मिक) वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
वनसगाव- मुंजाबा फाटा तालुका निफाड येथे तलशीगड (बिलमाळ) मठाधिपती संत स्वामी अनेकरुपीजी महाराज, पंच दशनाम जुना आखाडा मठाधिपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर,प्रती जेजुरी पाचोरे वणी मल्हारी मार्तंड चे प.पू.योगेश महाराज गवारे यांच्या शुभहस्ते वैष्णव वारकरी अध्यात्मिक गुरुकुल (वारकरी शिक्षण संस्था )भव्य उद्घाटन सोहळा
भक्तीमय वातावरणात संपन्न झाला आहे अशी माहिती वारकरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक ह.भ.प.धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव व वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचे मुख्य संचालक तथा मृदंग तालमणी हभप ओंकार महाराज रायते खडक माळेगाव यांनी दिली आहे
उद्घाटन सोहळा प्रारंभी सत्यनारायण पूजन करण्यात आली तर नंतर संत महात्म्यांच्या शुभहस्ते फित कापून असंख्य भाविकांच्या उपस्थिती वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळा संपन्न झाला. वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात संत महात्मे व नाशिक जिल्ह्यातील कीर्तनकार गुरुजन व उपस्थित मान्यवरांचे दिंडी द्वारे स्वागत केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व संत महात्मे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आधी सर्वांचा वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते ,हभप ओंकार महाराज रायते, हभप दत्ता महाराज साळवे,हभप नवनाथ महाराज बत्तासे ,हभप शिवराम महाराज बोराडे हभप मच्छिंद्र महाराज डुकरे ,हभप अभिजीत दादा डुकरे,हभप सौ कविता ताई पगार,हभप गोविंद भाऊ शिंदे, हभप निंबा भाऊ पगार, हभप अक्षय महाराज पवार, यशराज पगार आदींच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संत स्वामी श्री अनेक रुपी जी महाराज, महामंडलेश्वर आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज आदींनी आपल्या मनोगतात वैष्णव वारकरी अध्यात्मिक शिक्षण संस्थेला शुभेच्छा देत परिसरात एक अध्यात्मिक वातावरण निर्माण केल्याबद्दल आनंद व्यक्त करून वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते,हभप ओंकार महाराज रायते, ह भ प नवनाथ महाराज बत्तासे ,ह भ प शिवराम महाराज बोराडे, हभप दत्ता महाराज साळवे याचे
गोड कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
*यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते व वारकरी मंचचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तसेच दैनिक युवा मराठा चे निफाड तालुका प्रतिनिधी पत्रकार रामभाऊ आवारे सर वनसगाव यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल संत स्वामी अनेक रुपीजी महाराज व आचार्य महामंडलेश्वर रामकृष्णजी महाराज लहवितकर यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला*
उद्घाटन सोहळा प्रसंगी ह.भ.प कदम माऊली चांदवड. ह.भ.प.निवृत्ती म चव्हाण ठाणगांव, ह.भ.प. भास्कर म रसाळ आहेरगाव ,ह.भ.प. संजय म शिंदे कानमंडाळे, ह.भ.प बाळासाहेब म शिरसाट कोटमगाव, ह.भ.प तुकाराम बावा पवार सावरगाव ह.भ.प.निवृत्ती बाबा शिंदे ख माळेगाव, ह.भ.प. समाधान महाराज पगार भाटगाव, ह.भ.प. तुकाराम म वाजे वागदर्डी, हभप नंदु महाराज पवार, हभप साहेबराव आण्णा कुयटे, रत्नाकर साखरे आप्पा तसेच याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खा भास्कर भगरे सर यांच्या सुविद्य पत्नी सौ ताईसाहेब, माणिकराव तात्या बोरस्ते, गोदावरी बॅकेचे चेअरमन प्रणव दादा पवार, शिवा पाटील सुराशे पंचायत समिती निफाड, डी के नाना जगताप सभापती मार्केट कमिटी लासलगाव, शंतनू नानासाहेब पाटील लोकनेते दताजी पाटील बॅक, प्रकाश दायमा नामको, जयदत काका होळकर मा सभापती, मा सतीश भाऊ मोरे, शंकरराव वाघ माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, दत्तोपंत डुकरे सारोळे सरपंच, जगन दादा खापरे उगाव, नवनाथ माऊली बोरगुडे,केशवराव जाधव टाकळी, पर्यवेक्षक सोनवणे सर, चेअरमन धनंजय डुंबरे, सुरेश रायते संचालक खरेदी विक्री संघ लासलगाव, रामदास भिमाजी शिंदे माजी चेअरमन, संतोष अस्वले पोलीस पाटील ,पत्रकार रामभाऊ आवारे सर ,संभाजी यशवंत शिंदे, संजय रामभाऊ शिंदे, मधुकर आप्पा शिंदे, प्रकाश कापडी संचालक लासलगाव ख वि संघ,अरुण पाटील,दत्ता काका रायते ,पोपटराव रायते मा संचालक निसाका, सौ मंदाकिनी माधवराव रायते चेअरमन सोसायटी खडक माळेगाव, जगदीश पवार सरपंच खडक माळेगाव, बाळासाहेब रायते,अशोक रामकृष्ण रायते, मा श्री बबनराव काशिनाथ रायते, विजय रायते वकील, सतिष भाऊ मोरे भाजपा नेते,मा श्री अशोक भाऊ गारे, मा श्री दिनकर पंडित भोसले, भाऊसाहेब पाटील गांगुर्डे मा सरपंच कोटमगाव,मा श्री तुकाराम गांगुर्डे या सरपंच कोटमगाव, श्री बाबाजी पाटील कुशारे सरपंच सावरगाव, वैष्णव वारकरी अध्यात्मिक गुरुकुल, आत्मोन्नती विश्वशांती श्रीगुरु प्रेमळ स्वानंद वारकरी भक्त मंडळ नाशिक जिल्हा, छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय महाराज पवार, ह भ प मच्छिंद्र महाराज डुकरे, भागवताचार्य ह भ प कविताताई पगार यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव यांनी मानले.






