आशाताई बच्छाव
दारूबंदीची लढाई अजून मोठी होणार आहे… नाडसे गावाचा आवाज आता संपूर्ण तालुक्यात घुमतोय… पोलिसांची झोप उडेल की यंत्रणा पुन्हा झोपलेलीच राहील? धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ
साक्री तालुक्यातील नाडसे गावात गावठी व देशी दारू विक्रीने थैमान घातले असून, त्याविरोधात अखेर गावकरी रस्त्यावर उतरले. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या अवैध धंद्याला आळा घालावा, यासाठी गावातील महिलांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. सदर प्रकाराची गंभीर दखल घेत गावकरी आणि महिला यांनी एकत्र येत साक्री पोलीस ठाण्यात हजर राहून पोलीस निरीक्षक दीपक
वळवी यांना निवेदन दिले. महिलांच्या डोळ्यात अश्रू होते, हृदयात वेदना होत्या, पण शब्द होते ठाम – “दारू बंद झालीच पाहिजे!”
महिलांनी पोलिसांवरही थेट आरोप केले की, “गावात पोलिसांच्या डोळ्यादेखत सर्रास दारू विक्री सुरू असते, मग एवढा
अंधार कुठून येतो?” अशा शब्दांत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली.
लाचखोरीचा गंभीर आरोप
गावकऱ्यांचा स्पष्ट आरोप होता की, काही दारू विक्रेते पोलिसांना लाच देऊन धंदा बिनधास्तपणे चालवतात. त्यामुळे कारवाई होत नाही आणि गावात दारूच्या गंजलेल्या बाटल्या वाढतच आहेत. “कायदा फक्त कागदावरच राहिला आहे का?” असा सवाल ग्रामस्थांनी केला.