Home नाशिक मेशी ता. देवळा येथे धाडसी घरफोडी. सोने,चांदीच्या दागिन्यांसाह रोकड लंपास .

मेशी ता. देवळा येथे धाडसी घरफोडी. सोने,चांदीच्या दागिन्यांसाह रोकड लंपास .

168

आशाताई बच्छाव

1001694657.jpg

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- मेशी ता. देवळा येथे धाडसी घरफोडी. सोने,चांदीच्या दागिन्यांसाह रोकड लंपास .
मेशी येथे कैलास जयराम शिरसाठ हे गावात भाडोत्री घरात पत्नी व दोन मुलांसोबत राहतात मात्र गुरुवारी (दि.१०) रोजी गावातील घराला कुलूप लावून मळ्यात मुक्कामी गेले असता घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या लोखंडी कपाटातून दहा भार चांदी,नऊ ग्रॅम सोने व पंचावन्न हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून पोबारा केला .शिरसाठ जेव्हा सकाळी गावात आले असता घराला कुलुपच नव्हते तेव्हा घराचा दरवाजा उघडत मध्ये बघितले तर सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले व लोखंडी कपाट उघडे असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ देवळा ठाण्याशी संपर्क करत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर प्रकार पाहता नाशिक येथील श्वानपथक व ठसातज्ञ यांना पाचारण केले काही वेळाने श्वानपथक येऊन पथकाने गावाबाहेरपर्यंतचा मार्ग दाखविला मात्र चोरटे हे दुचाकीने आले असल्याचा अंदाज घेत पुढील मार्ग श्वानपथकाला दाखविण्यास अडचण आली . याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर,पोलीस हवालदार सोनवणे, संदीप चौधरी, राहुल शिरसाठ आदी करत आहेत
दरम्यान सुमारे एक वर्षांपूर्वी दिलीप शिरसाठ यांचेदेखील बंद घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता तर २७ मार्च २०२५ रोजी गावातीलच एका फोटो स्टुडिओ मधून तीन कॅमेरे ( अडीच लाख रुपये किंमतीचा ऐवज) चोरट्यांनी लंपास केले आहेत या घटनेचा शोध लागत नाही त्यातच आणखी एक घरफोडी झाल्याने देवळा पोलिसांसमोर सदरील घटनेचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.