Home बुलढाणा इम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमीचा स्फोट ! – अवैध गॅस...

इम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमीचा स्फोट ! – अवैध गॅस रिफील -करणाऱ्यांचे धाबे दणाणले ! – तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

84

आशाताई बच्छाव

1001694670.jpg

इम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमीचा स्फोट ! – अवैध गॅस रिफील -करणाऱ्यांचे धाबे दणाणले ! – तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- जळगाव जामोद ‘बुलढाणाच्या छाताडावर अवैध सिलिंडरचा धंदा!’ या या मथळ्याखाली काल बातमी प्रसारित करताच प्रशासनाने दखल घेत, धडाकेबाज कारवाई करीत तब्बल ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जळगाव जामोद शहरातील अंबिका टाइल्स च्या पाठीमागील एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यावर पुरवठा विभाग व जळगाव जामोद पोलीस पथकाने छापा टाकत या ठिकाणाहून पाच सिलेंडर, तीन इलेक्ट्रिक मोटर, एक वजन काटा यासह ज्या वाहनात घरगुती गॅस भरला जात होता ती मारुती सुझुकी कंपनीची एम एच २८ बीके ०७५८ क्रमांकाची ईको गाडी असा एकूण ३ लाख २९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तहसील विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड तसेच पुरवठा निरीक्षक आठवले यांच्यासह पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे पीएसआय राजकुमार कांबळे यांनी ही धडक कारवाई केली. एका आरोपीसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सय्यद साबीर सय्यद शकुर रा. राणी पार्क जळगाव जामोद याला अटक करण्यात आली आहे. यासंबंधीची फिर्याद नायब तहसीलदार सुधीर कुमार गायकवाड यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ कलम ४(१) (A) नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई नायब तहसीलदार पुरवठा विभाग सुधीरकुमार गायकवाड, पुरवठा निरीक्षक आठवले, पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय राजकुमार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत भिसे, अयुब शेख शेख यांनी केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जामोद तालुक्यातील वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून कारवाईच्या भीतीपोटी वाहनांमध्ये अवैध गॅस भरणा केंद्रे बंद केली आहेत.

Previous articleमेशी ता. देवळा येथे धाडसी घरफोडी. सोने,चांदीच्या दागिन्यांसाह रोकड लंपास .
Next articleपत्रकार, समाजसेविकेचा छळ करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.