Home नाशिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या मागणीसाठी देवळा येथे प्रहारचा मोर्चा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या मागणीसाठी देवळा येथे प्रहारचा मोर्चा

98

आशाताई बच्छाव

1001694568.jpg

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या मागणीसाठी देवळा येथे प्रहार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देवळा पाच कंदील ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते,
यवतमाळ जिल्ह्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या केली त्या ठिकाणाहून मा आ बच्यु कडु यांनी पायी आणि अनवाणी पदयात्रा सुरू केली आहे , शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचा साठी महाराष्ट्र शासनाने येत्या २ आक्टोबर पर्यंत निर्माण घ्यावा, कांद्याला ३००० रुपये प्रति क्विंटल दर द्यावा,नाफेड आणि एनसिसिएफ ने कांदा खरेदी ही खुल्या बाजारात खरेदी करावा,नाफेड ने खरेदी केले्ल्या मालाची संपूर्णया चौकशी करून दौऱ्यावर कारव्हायी करावी, दिव्यांगांना ६ हजार रुपये प्रति महिना दिव्यांग भत्ता मीळावा अशा १७ मागन्यांचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना देण्यात आले, सकाळी १२वाजता प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी पांच कंदील येथील छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पदयात्रेला सुरूवात केली दुपारी दिड वाजता तहसील कार्यालय देवळा येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली,या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे हरी सिंग ठोके, कळवण तालुक्याचे रामा पाटील, भुषण निकम, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, दिपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी सांगितले की जो पर्यंत सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, वेळ पडल्यास हजारो टृक्कर चा मोर्चा मुंबई येथील मंत्रालयावर धडकेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे ठणकावून सांगितले, पदयात्रेने आलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या समोर मा तहसिलदार मिलिंद कुलकर्णी यांनी मोर्चकऱ्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, हरी सिंग ठोके , क्रुष्णा जाधव यांच्या हस्ते तहसिलदार मिलिंद कुलकर्णी यांनी स्विकारले, प्रहार शेतकरी संघटनेचे बागलाण चे अध्यक्ष गणेश काकुळते, चांदवड तालुका अध्यक्ष चंद्रकांत जाधव,अंतु पवार, रत्नाकर देवरे, शिवाजी शिरसाट,माधव शिरसाट, महेंद्र आहेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास कोकरे, बंडु आढाव, गणेश शेवाळे, आदी सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, फोटो ओळ, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा , या सह १७ मागन्यांच निवेदन तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना देवतांना गणेश निंबाळकर, कुबेर जाधव, हरिसिंग ठोके व इतर पदाधिकारी

Previous articleश्रीक्षेत्र वनसगाव- मुंजाबा फाटा येथे वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा
Next articleमेशी ता. देवळा येथे धाडसी घरफोडी. सोने,चांदीच्या दागिन्यांसाह रोकड लंपास .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.