Home जळगाव प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर,

प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर,

285

आशाताई बच्छाव

1001678487.jpg

प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर,

 

चोपडा प्रतिनिधी

सुरेंद्र बाविस्कर

चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढ एकादशी निमित्त “महोत्सव विठ्ठलाचा, महागजर विठ्ठलाचा”… वारकरी संप्रदायातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रुक्मिणी यांचा उत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर, वारकरी संप्रदायातील पारंपारिक खेळ, भजन,अभंग, संत जनाबाई यांच्या ओव्या गायन, लेझीम ,टाळमृदुंग, रिंगण सोहळा,फुगडी ,भक्तीगीते, कलानृत्य विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सादरीकरण केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून आपला सहभाग नोंदविला “माऊली माऊली” या नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तीमय झाले होते.

 

त्याप्रसंगी प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक रजीश बी. सर, उपमुख्याध्यापिका निखिला मॅम संस्थेचे समन्वयक श्री गोविंद गुजराथी, श्री शरद पाटील सर तसेच सौ. चेतना बडगुजर ( सूत्रसंचालन) व क्रीडाशिक्षक श्री समाधान माळी सर(रिंगण मार्गदर्शन), सौ. प्रियंका महाजन(प्रस्तावना) तसेचक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले…..

Previous articleटिटाणे माळमाथा परिसरात पावसाची रिपरिप शेती कामांचा खोळंबा
Next articleबा पांडुरंगा … बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.