आशाताई बच्छाव
कांदा उत्पादक संघटनेच्या निवेदनाची आमदार मंजुळाताई यांनी घेतली दखल
पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित.
धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ
विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार मंजुळाताई गावित यांनी कांदा उत्पादकांना हमीभाव द्यावा, साक्री तालुक्यात वीज प्रतिबंध योजना त्वरित बसवावी अशी मागणी आपल्या भाषणात केली आहे.
शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा शेतकऱ्यांचा हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यातील बळीराजाला धैर्य देणे त्याला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्ती पासून वाचवण्यासाठी श्वासत उपाय योजना केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन
पावसाळी अधिवेशनात अध्यक्ष महोदयांसमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करताना साक्री तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित
करते असे मंजुळा ताईंनी आपल्या भाषणात विचार मांडले.
आमदार मंजुळा गावित यांनी आपल्या भाषणात साक्री तालुक्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे अध्यक्षांना असे सांगितले की माझ्या मतदारसंघात दि.६ ते ७ मे पासून पाऊस सुरू झाला आहे. त्यात शेतकऱ्यांची कांद्याचे फार मोठे नुकसान झाले आहे पंचनामे झाले
आहेत परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाई अनुदान तातडीने मिळावे आणि कांद्याला हमीभाव ३५०० रु. पर्यंत तरी मिळायला पाहिजे अशी विनंती अध्यक्ष महोदयांना आमदार त्यांनी केली. जसे की गुजरात राज्यात शेतकऱ्याला दोनशे रुपये अनुदान दिले त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना पाचशे रुपये अनुदान द्यावे ही विनंती आमदार ताईंनी अध्यक्ष महोदयांना केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आमदार मंजुळा गावित पावसाळी अधिवेशनात आपले भाषण गुरुवार दि. ३.६.२०२५ रोजी केले.






