आशाताई बच्छाव
शिधापत्रिकाधारकांना ई- केवायसीसाठी आवाहन
साक्री, संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ धुळे नंदुरबार: तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारकांनी शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची ई-केवायसी नजीकच्या रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधून ई-पॉस मशिनवर ३० जुलै च्या आत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले आहे.






