Home नांदेड वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर धडक कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर धडक कारवाई

92

आशाताई बच्छाव

1001674957.jpg

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर धडक कारवाई

१३ दुचाकी धारकांकडून दंडापोटी ८५०० रूपये वसूल

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर शहरात वाहन चालविण्याचा
परवाना नसलेल्या, ट्रिपल सीट बसून दुचाकी चालविणाऱ्या, दुचाकीला नंबर प्लेट नसलेल्या, आरसी बुक नसलेल्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी धारकांविरुद्ध देगलूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून १३ दुचाकी धारकांकडून दंडापोटी ८५०० रूपये वसूल केले.
गेल्या कांही महिन्यांपासून देगलूर शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग परिसरात अल्पवयीन सडक सख्याहरींचे टोळके दुचाकीवर डबल सीट, ट्रिपल सीट बसून धुडगूस घालत आहे. एवढेच नव्हे तर शहरातील अनेक दुचाकीधारक नंबर प्लेट नसलेली दुचाकी चालवत आहेत. वाहन चालवण्याचा परवाना नसलेले अनेक युवक तसेच प्रौढ नागरिक बिनधास्तपणे दुचाकी घेऊन शहरात फिरत आहेत. अनेक जण आरसीबुक सोबत न ठेवता दुचाकी घेऊन फिरत आहेत. त्यामुळेजनता त्रस्त झाली आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन देगलूर पोलीस ठाण्याच्या वतीने सपोनि अश्रूदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे व ट्रॅफिकचे पोलीस जमादार माधव मरगेवार यांच्या नेतृत्वाखाली कांही पोलीस कर्मचारी व तब्बल २५ होमगार्डचे दोन पथक तयार करण्यात आले. यातील एक पथक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात तर दुसरे पथक पाण्याच्या टाकीजवळ नवीन सराफा मार्केटच्या कोपऱ्यावर कार्यरत होते. या पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकी धारकांकडे आरसीबुक, ड्रायव्हिंग लायसनची मागणी केली. ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी धारकांना थांबवून त्यांची चौकशी केली. नवीन नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांचीही चौकशी करण्यात आली.