Home नांदेड श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार.

91

आशाताई बच्छाव

1001674926.jpg

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार.

 

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा करण्यात आला. यावेळी सोलापूर चे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस व मान्यवर उपस्थित होते.

वारीची परंपरा सातत्याने वाढत असून यावर्षी वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. दिंड्यांसोबत वारकरी आलेच परंतु पायी चालतही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार समारंभात म्हणाले.

‘निर्मल वारी’च्या माध्यमातून अतिशय चांगच्या व आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि #निर्मलवारी सोबत #हरित, #पर्यावरणपूरक वारी देखील झाली. खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची आहे. – मुख्यमंत्री श्री. फडणवीस

सत्कार सोहळ्यात आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआषाढी एकादशी निमित्त निघालेल्या शालेय दिंडीचे अशोकनगर नित्य सहाय्यकारी माता चर्चच्या वतीने भव्य स्वागत.
Next articleवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर धडक कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.