Home जालना बालाजी चौक -राजुर चौफुली रोडवर खड्डेच खड्डे मनपाने दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन-...

बालाजी चौक -राजुर चौफुली रोडवर खड्डेच खड्डे मनपाने दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन- जीवन सले

91

आशाताई बच्छाव

1001657752.jpg

बालाजी चौक -राजुर चौफुली रोडवर खड्डेच खड्डे
मनपाने दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन- जीवन सले
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
जालना शहरातील बालाजी चौक ते राजुर चौफुली पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे. या रस्त्याची दुरूस्ती करून, रस्त्यावर पथदिवे  सुरू करावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा जालना मनपाचे माजी आरोग्य सभापती जीवन सले यांनी दिला आहे.
जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरातील अत्यंत महत्वाचा बालाजी चौक ते राजुर चौफुली पर्यत रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. या रस्त्यावर ढवळेश्‍वर महादेव मंदिर आहे. 10-12 दिवसाने श्रावण महिना लागेल. श्रावण महिन्यात दररोज 1500 ते 2 हजार भाविक भक्त दर्शनासाठी येथे येतात.
ही बाब विचारात घेवून,  जालना शहर महापालिकेने या रस्त्याची मुरूम टाकुन दुरूस्ती करावी व पावसाळ्यानंतर डांबर पॅच  करावा, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आरोग्य सभापती जीवन सले यांनी दिला आहे.

Previous articleजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डि. बी. टी. पोर्टलद्वारे निधी वितरीत होणार
Next articleमौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.