Home बुलढाणा आरीफ डॉनची मलकापूरमध्ये धिंड ?शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

आरीफ डॉनची मलकापूरमध्ये धिंड ?शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

82

आशाताई बच्छाव

1001652454.jpg

आरीफ डॉनची मलकापूरमध्ये धिंड ?शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर
एखादा गुन्हेगार स्वतः ला कितीही मोठा डॉन समजत असला तरी कायद्यासमोर त्याची किंमत शून्य आहे, कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही, याचा प्रत्यय मलकापूर शहरवासियांना आला. सद् रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य तंतोतंत खरे ठरल्याचेही पोलिसांच्या कारवाईमुळे दिसून आले.
काही दिवसांपूर्वी शहरातील माळीपुरा भागातील अंमली पदार्थ तस्कर व कुख्यात गुन्हेगार आरीफ याने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. आपली दहशत निर्माण व्हावी या हेतूने शहरभर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल केला. ही माहिती मिळताच ठाणेदार गणेश गिरी यांच्या आदेशाने तत्काळ पोलिसांची टीम घटनास्थळावर पोहोचली.
मात्र, शहर पोलिसांची टीम माळीपुरा भागात पोहोचल्यानंतर कुख्यात गुन्हेगार आरीफच्या साथीदारांना शहर पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. जमलेला जमाव पोलिसांच्या अंगावर धावून आला. परिस्थितीचा फायदा घेऊन कुख्यात गुन्हेगार आरीफ तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तेथील जमावानेच वातावरणात तणाव निर्माण करत खराब करत
कुख्यात गुंड आरीफ डॉन च्या हातात बेड्या घालून शहर पोलिसांनी त्याची काढलेली धिंड ?, हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठाणेदार गणेश गिरी यांनी दिलेला स्पष्ट ईशारा आहे. कायद्यात राहाल तर फायद्यात रहाल अन्यथा यापेक्षाही कडक कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, हा संदेश त्यांनी दिला आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हा राहिलाच पाहिजे. अन्यथा शहरातील सुव्यवस्था डळमळीत होते. त्याचे दुरगामी परिणाम सामान्य नागरिकांना नाहक भोगावे लागतात हे सूर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे. जिल्ह्याला लाभलेले आयपीएस पोलीस अधीक्षक निलेश तांबे व आयपीएस अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारांची आता कसलीही गय केली जाणार नाही ही बाब मात्र अधोरेखित झाली आहे.
एकप्रकारे आरीफला पळून जाण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

परिसरात निर्माण झालेली अशांतता पाहता पोलिसांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. मात्र, त्यानंतर ठाणेदार गणेश गिरी यांनी पोलिसांचे एक पथक गठीत करून कुख्यात गुन्हेगार आरीफचे शोधकार्य वेगाने सुरू केले. ठाणेदार गिरी यांच्या पथकाने नियोजनबद्ध तपास करत अखेर २७ जून रोजी आरीफच्या मुसक्या आवळण्यात यश आले. मात्र, केवळ यावरच न थांबता ठाणेदार गिरी यांनी धडाकेबाज निर्णय घेतला.कुख्यात गुन्हेगार आरीफ डॉनची शहर वासियांच्या मनात असलेली दहशत संपविण्यासाठी आरीफची संपूर्ण शहरभर हातात बेड्या घालून धिंड काढली? कायदा व सुव्यवस्था सगळ्यात मोठी आहे, त्यासमोर आरिफ सारखे स्थानिक गुंड नगण्य आहेत, असा अनुभव शहरवासियांना या कारवाईमुळे आला. कुख्यात गुन्हेगारची शहरभरात निघालेली धिंड ? पाहून नागरिकांनी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

यानंतर आरोपी आरीफ याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. आरीफचे अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणून या मागे असलेल्या आंतरराज्यीय टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरणार आहे.

Previous articleसौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बनावट परवानगी देणे भोवले ?
Next articleपोलिसांचा धाक संपला ? – चोरट्यांचा ‘किराण्या’वर डल्ला !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.