आशाताई बच्छाव
जनतेला स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेले पाणी द्या!
आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भोकरदन नगर परिषदेच्या सीओ ला घातला घेराव – बोरसे गुरुजी
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 ते 1 वाजेच्या दरम्यान आम आदमी पार्टीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी त्यामध्ये महिला आणि पुरुष सामील होते.नगरपरिषदे समोर जमा होऊन ठिय्या आंदोलन केले. शहराला नियमित पिण्याचे स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेले पाणी पुरवठा करा.या मुख्य मागणीसाठी अगोदर देण्यात आलेल्या निवेदना प्रमाणे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. असे बोरसे गुरुजींनी कळविलेले आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कार्यालय सोडून बाहेर आंदोलन कर्त्यांना भेटण्यासाठी येत नसल्याने सर्व संतप्त कार्यकर्ते महिला पुरुष कार्यालयामध्ये घुसून त्यांनी मुख्याधिकाऱ्याला जाब विचारला. त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वाघमारे यांनी कार्यकर्त्यांना पोलीस केस करण्याची धमकी दिली. आम्ही पाण्यासाठी आपणाकडे आलो आहोत. आमचे प्रश्न सोडवा! पोलीस केस करण्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही जनतेची कामे करा. तुम्ही अधिकारी आहात नागरिकांसोबत असे वागणे आपणास शोभत नाही.या पद्धतीने शहराध्यक्षांनी त्यांना समज दिली आम्हाला नळाचे जे पाणी तुम्ही पुरवतात तेच पाणी तुम्ही प्या असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. यामध्ये संतप्त कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.नळाला येणारे घाणेरडे पाणी मुख्याधिकाऱ्याला पाजवणार कर्मचाऱ्यांना पाजवणार दोन तास नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असे प्रशासनाला अगोदरच कळविण्यात आले होते. प्रशासन कोणतेही तत्परता दाखवायला तयार नसल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत.कोणत्याही मूलभूत सुविधा जनतेला मिळत नाहीत. नगरपरिषदेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो. असे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच आरोप आहेत.प्रत्येक मुद्द्यावर आम आदमी पार्टी मार्फत लढा देणे सुरू आहे. आता आम्ही या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत की गरीब लोकांच्या प्रतिनिधींना नगरपरिषदेत पाठवल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. कारण भोकरदन शहरांमध्ये जे काही प्रस्थापित पक्षांचे पुढारी आहेत आणि श्रीमंत लोक आहेत त्यांचे गरिबांच्या समस्येकडे लक्ष नाही. असे बोरसे गुरुजींनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकामध्ये कळविलेले आहे.यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष महेजाद खान तालुकाध्यक्ष सोळंके पाटील शहर उपाध्यक्ष फारुख भाई,जुनेद भाई, नोजेर शहा, शिराज भाई,एकबाल भाई, इब्राहिम कुरेशी, आजमत कुरेशी, इरफान शेख, सलमान शेख, मुदसशीर शेख,अब्दुल रहमान, जावेद शेख, सलीम भाई, आरिफ भाई,सीमा शेख। नीलोफर बागवान, नाजिया बेगम समरीन बेगम, सना बेगम , शबनम बेगम हसीना बेगम, शकीला बेगम रुकैया बेगम करीमुन निशा , गोरी बाजी, शगुफ्ता खान, सायरा बेगम अफसा खान नसरा ,जमीला शेख आशिया शेख नाजिया शेख नगमा , निशा यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.






