Home नांदेड पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत नवे चेहरे; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात...

पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत नवे चेहरे; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात पार.

168

आशाताई बच्छाव

1001649103.jpg

पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत नवे चेहरे; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात पार.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर – पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने सक्रिय असलेल्या पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुकाच्या कार्यकारिणीत नवीन पदाधिकाऱ्यांची भर टाकण्यात आली. आज तालुकाध्यक्ष शेख असलम यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या संपर्क कार्यालयात पदोन्नती व नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात धनाजी जोशी यांना सहकार्याध्यक्ष म्हणून पदोन्नती देण्यात आली. तर श्वेता चिदमलवाड यांची संघटक, प्रभु वंकलवार यांची सहसंघटक, आणि इस्माईल खान यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका सचिव गजानन टेकाळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “मागील सहा महिन्यांपासून पत्रकार संरक्षण समितीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पत्रकारांच्या सन्मानासाठी सतत कार्यरत राहिली आहे. अडचणीत सापडलेल्या पत्रकारांसाठी धावून जाणारी ही संघटना आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी सांगितले की, “पत्रकार संरक्षण समिती ही संघटना नसून पत्रकारांचे कुटुंब आहे. कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. कोणताही गट, पक्ष न पाहता पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे ध्येय आहे.”
दरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत, संघटनेच्या कामात जबाबदारीने योगदान देण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सदस्य उबेद हबीब, पत्रकार अनिल पवार, शेख अफान व अन्य पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे केले तर आभार प्रदर्शन तालुका सचिव गजानन टेकाळे यांनी केले…

Previous articleवाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, समृध्दी महामार्गामुळे अतोनात नुकसान
Next articleसंघर्षमय जीवनातील प्रवासाचा वाटसरु म्हणजे माझा मोठा भाऊ,माझा आधारस्तंभ – प्रकाश दत्ता सोनकांबळे बेटमोगरेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.