Home अमरावती अखेर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर सरन्यायाधी भूषण गवई यांचे” चार्टर प्लेन “अमरावती येथील...

अखेर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर सरन्यायाधी भूषण गवई यांचे” चार्टर प्लेन “अमरावती येथील सत्कार समारंभा नंतर संभाजी नगर कडे रवाना. बेलोरा विमानतळावरील एटीसी कडून होल्ड

87

आशाताई बच्छाव

1001642465.jpg

अखेर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर सरन्यायाधी भूषण गवई यांचे” चार्टर प्लेन “अमरावती येथील सत्कार समारंभा नंतर संभाजी नगर कडे रवाना. बेलोरा विमानतळावरील एटीसी कडून होल्ड . दैनिक युवा मराठा. पी. एन. देशमुख . अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथील सत्कार समारंभ प्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या सावद शील भाषेत सांगितले की मला वकील व्हायचे नव्हते व्हायचे होते आर्किटेक परंतु माझे वडील दादासाहेब गवई यांची इच्छा होती की मी वकील व्हावं ती मी पूर्ण केली माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा असेल तर तो माझे वडील दादांचा लहानपणापासून त्यांच्यासोबत वावरण्याची संधी मिळाली त्यामुळे समाजाबद्दल आपली काय सविधान असावी हे जवळून बघता आले त्यांनी त्यांची जळणघडण्याचा त्यांच्या सानिध्यात झाली खरंतर दादांना वडील व्हायचे होते परंतु त्यांची लाची परीक्षा असताना ते सत्यग्रहात कारागृहात होते आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ सेवा देत असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं त्यांचा आदेश मी पूर्ण केला आणि वकील झालो पुढे न्यायाधीश झालो अशी प्रांजळ कबुली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी दिली संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले जनतेच्या अधिकाराचे जतन करण्याची जबाबदारी न्यायपालिकावर आली आहे. समता स्वातंत्र्य न्याय बंदुत्वाला बाधा पोहोचणार नाही याची न्यायनिर्वाळा देताना काळजी घेतली सामाजिक आर्थिक समस्येवर तोडगा काढताना काही प्रकरणात राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकाऱ्यांचा वापर केला कोण काय म्हणेल त्यापेक्षा समाजाला काय हवे? याची जाणीव ठेवून काही प्रकरणे हाताळल्याचे त्यांनी अधोरेखित केले कठोरा मार्ग लागतच्या पीआरपोटे पाटील एज्युकेशन इन्स्टिट्यूट परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या स्पर्धेत सत्कार सोहळ्याप्रसंगी मंचावर माजी सरन्यायाधीश एन व्ही रमणा तसेच डॉक्टर कमलाताई गवई, डॉक्टर तेजस्विनी गवई यांची विशेष उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे होते प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, अमरावती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यागड्डाअमरावतीचे पालक सदस्य एडवोकेट आशिष देशमुख आणि बार कौन्सिल महाराष्ट्र व सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य एडवोकेट परिजात पांडे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांना कशाल श्रीफळ मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विधिमंडळ कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्याय प्राधिकार आणि माध्यम ही चार स्तंभ असली तरी त्याच्या देशाचे संविधान हेच सुप्रीम असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अधोरेखित केले. कारण न्यायदान हे जॉब नाही तर ते सतीचे वाण आहे. न्याय न्यायाधीशांना राज्यघटनेला आधारित न्यायनिर्वळा द्यावा लागतो वकील यांना सुद्धा प्रचंड श्रम मेहनत करावी लागते असे ते म्हणाले.